Fish Rain in Honduras : तेगूसिगल्पा : पावसाळ्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडतो असतो. कित्येकदा गारपीट होते. काही ठिकाणी बर्फवृष्टी होते. पण तुम्ही कधी माशांचा पाऊस पडल्याचे ऐकले आहे का? एक असे ठिकाण आहे, जिथे तब्बल १०० वर्षे माशांचा पाऊस पडतो आहे. हे ठिकाण आहे होंडुरास (Honduras).
होंडुरास (Honduras) हे मेक्सिकोच्या शेजारील देश. होंडुरासमध्ये (Honduras) वसंत ऋतूच्या शेवटी किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला माशांचा पाऊस पडतो. कधी वर्षातून एकदा तर कधी दोनदा. जेव्हा माशांचा पाऊस पडतो तेव्हा लोक बादल्या घेऊन येतात आणि मासे घेऊन जातात.
येथे मासे पडण्याला लोक देवाचा चत्मकार मानतात. लोकांचा विश्वास आहे की एकोणिसाव्या शतकात जेव्हा लोक उपासमारीने मरत होते, तेव्हा एक पुजारी सतत देवाची प्रार्थना करत असे. त्यानंतर देवाने आकाशातून माशांचा पाऊस पाडला. शास्त्रज्ञांनुसार हे ठिकाण अटलांटिक महासागरापासून फक्त २०० किलोमीटर अंतरावर आहे.
त्यामुळे हा पाऊस पडण्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत. समुद्रामध्ये जेव्हा जोराचे वारे वाहू लागतात, तेव्हा समुद्रात मोठमोठे भोवरे तयार होतात. या भोवऱ्यामुळे समुद्रातील छोटो मासे बाहेर फेकले जातात. हे मासे किनाऱ्याजवळील शहरांवर आदळतात. यालाच माशांचा पाऊस म्हटले जाते.
Caves and Rock Art : लेणी आणि कातळशिल्पे
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.