अखेर ३ संचालकांसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Hingoli credit society fraud हिंगोली : मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या येथील पतसंस्थेत ६१ ठेवीदारांची १.६९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी, तीन संचालकांसह एकूण सहा जणांविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात रविवारी (दि.१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतसंस्थेने येथील काही व्यक्तींनी तसेच ठेवीदारांना आकर्षक परतावा आणि विमा संरक्षणाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे, अशी माहिती रविवारी एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. येथील नवा मोंढा भागात असलेल्या हिंगोली अर्बन निधी लिमिटेड या पतसंस्थेच्या तीन बँक संचालकांविरुद्ध आणि तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव फटाले नावाच्या व्यक्तीने हिंगोलीत दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी संस्थेत १४.२५ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.
हिंगोली शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून येथील आर्थिक गुन्हे शाखा प्रकरणाचा तपास करत आहे. तक्रारीनुसार, सदर पतसंस्थेने ठेवींवर १२ टक्के व्याज देण्याचे आणि ३ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर विमा संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. अशा आश्वासनांना भुलून अनेक लोकांनी मे २०२० ते मार्च २०२४ कालावधीत आपली बचत संस्थेत गुंतवली होती.
कंपनीने पैसे परत केले नाहीत
ठेवींची मुदत संपल्यानंतरही कंपनीने पैसे परत केले नाहीत आणि अखेरीस आपले कार्यालयही बंद करून टाकले असा देखील प्रकार समोर आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, वैभव फटाले आणि इतर गुंतवणूकदारांनी त्यानंतर सहकार विभागाकडे धाव घेतली. हिंगोली सहकार विभागाने केलेल्या चौकशीत ६१ ठेवीदारांचे एकूण १ कोटी ६९ लाख १५ हजार ४९३ रुपये बुडाल्याचे निष्पन्न झाले आहे. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपीत हिंगोली अर्बन निधी लिमिटेडचे संचालक जयेश खरगुले, संतोष धुडकेकर आणि रोहिन खरगुले, तसेच कर्मचारी दिनेश अनेकर, मोनाली आंबेकर आणि अजिंक्य खरगुले यांचा समावेश आहे.
१२ टक्के व्याजाचे दाखविले आमिष
हिंगोली शहरातील नवा मोंढा भागात असलेल्या सदर पतसंस्थेत सुरुवातीच्या काळात १२ टक्के व्याज देत ग्राहकांना मोठे आमिष दाखवले जात होते. परंतु नंतर पतसंस्थेने मात्र आपली पतसंस्था बंद केली. मध्यंतरी हिंगोली येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने त्या पतसंस्थामधील ग्राहकांना आवाहन करून त्यांची सर्व माहिती संकलित करण्याचे काम करण्यात आलेले आहे. परंतु अजून तरी पुढील ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याने खातेदार मात्र प्रतीक्षा करून आहेत. शिवाय त्याच नावाने असलेल्या पतसंस्थेत देखील झालेल्या गडबड गोंधळाची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून संकलित केली जात होती.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Maharashtra Local Body Elections- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका मार्गी!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.