Ad Advertisement Ad Advertisement

Horizon Supercomputer : अमेरिकेतील शक्तिशाली शैक्षणिक सुपरकॉम्प्युटर होरायझन कार्यान्वित; 132 पेटाफ्लॉप्स वेगाने करणार संशोधन

हवामान अंदाज, वैद्यकीय संशोधन, भूकंपशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्राला मिळणार मोठी चालना

ऑस्टिन (टेक्सास) : Horizon Supercomputer वैज्ञानिक संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्राला मोठी गती देणारे अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली शैक्षणिक सुपरकॉम्प्युटर होरायझन अखेर कार्यान्वित झाले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ॲट ऑस्टिनमधील टेक्सास ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग सेंटर येथे उभारण्यात आलेले हे महासंगणक यंत्र संशोधकांच्या वापरासाठी खुले करण्यात आले आहे. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या निधीतून साकारलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

नोव्हेंबर २०२६ च्या टॉप-५०० जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटरच्या यादीत होरायझनने २४ वे स्थान पटकावले आहे. या महासंगणकाचा वेग तब्बल १३२ पेटाफ्लॉप्स इतका प्रचंड असून, याच्या पहिल्या टप्प्यात ४,००० प्रगत एनव्हीडिया जीपीयू बसवण्यात आले आहेत. टेक्सासच्या राउंड रॉक येथील अत्याधुनिक डेटा सेंटरमध्ये हे यंत्र बसवले असून, यापूर्वीच्या फ्रोंटेरा सुपरकॉम्प्युटरच्या तुलनेत हे १० पटीने अधिक वेगाने सिम्युलेशन करण्यास सक्षम आहे. २०२७ च्या सुरुवातीला यात अधिक सीपीयू क्षमता जोडली गेल्यानंतर याचा वेग आणखी वाढणार आहे.

या महासंगणकाच्या उपलब्धतेमुळे देशातील आघाडीच्या शास्त्रज्ञांना अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नांवर संशोधन करणे शक्य होणार आहे. विशेषत: अचूक हवामान अंदाज आणि अचानक येणाऱ्या पुरांचे नियोजन, वीज ग्रीडची सुरक्षितता, भूकंपशास्त्र, खगोलशास्त्र आणि नवीन क्वांटम मटेरियल्सच्या शोधासाठी याचा मोठा वापर केला जाईल. याशिवाय, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरील नवीन औषधांच्या संशोधनालाही यामुळे मोठी चालना मिळणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महाकाय डेटा विश्लेषणाची सांगड घालणारे हे होरायझन सुपरकॉम्प्युटर भविष्यातील अनेक शोधांचे केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास टीएसीसीसी चे कार्यकारी संचालक डॅन स्टॅन्झिओन यांनी व्यक्त केला आहे.

Read About : Animals Sixth Sense : पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वेध घेणारे प्राण्यांचे सहावे इंद्रिय; मानवासाठी मात्र हे गूढ अद्याप कायम
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.