Ad Advertisement Ad Advertisement

Firecracker 30 Fire Incidents – फटाक्यामुळे कचरा, वाहने, झाडे आणि गॅलरी पेटली

दिवाळीच्या दिवशी शहरात ३० ठिकाणी लागली आग : अग्निशमन दलाने सतर्कता दाखवित मिळवले नियंत्रण

छत्रपती संभाजीनगर : Firecracker 30 Fire Incidents : दिवाळीनिमित्त नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. रॉकेट, अ‍ॅटमबॉम्ब, सेव्हन शॉटसह विविध प्रकारच्या आवाजांचे फटाके फोडले. फटाके फोडण्याचा आनंद लुटत असताना, या फटक्यांमुळे शहरात विविध ३० ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. जळालेल्या फटाक्यांमुळे कचरा, गवत पेटले, गॅरेजला आग लागून ४ वाहनांचे नुकसान झाले, दोन ठिकाणी बंद असलेल्या घरातील काही सामान जळाले, तर काही ठिकाणी झाडांनीही पेट घेतला. या घटनांची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.

फटक्यांमुळे आग लागण्याची शक्यता लक्षात घेता, मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तथा अग्निशमन विभागप्रमुख अंकुश पांढरे यांनी अग्निशमन विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी पदमपूरा, सिडको, चिकलठाणा अग्निशमन केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांकडून येणाऱ्या फोनद्वारे संबंधितांना निर्देश दिले. अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनांमध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे खांडेकर यांनी सांगितले.
८ व ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सिडको एन-१ मधील सर्व्हिस इंडस्ट्रीयल रवी मसालेजवळील संकेत मोटार गॅरेजमधील भंगाराला आग लागली. शहागंज जुने बसस्थानक मोकळ्या मैदानात पाणीपुरवठ्याच्या पाइपला आग लागली.

हडकोतील सर्विस रोडच्या बाजूला बंद घरामध्ये आग, नागेश्वरवाडी झाशीची राणी चौक पोलीस उपअधिक्षक कार्यालयाबाजूला झाडाला आग, जिन्सीतील मुसा चौकातील शेडला आग, पिसादेवी रोडवरील गुरांच्या गोठ्याला आग, चिस्तीया चौकातील एका पत्र्याच्या दुकानाला आग, नारेगावमधील मांडवी चौक येथे कुलर कंपनीला आग, ज्योतीनगरातील ज्योती मंदिराजवळ पारिजात अपार्टमेंटजवळील झाडाला आग, शहानुरवाडी येथे झाडाला आग, आयप्पा मंदिराजवळ गॅरेजला आग, फुलंब्रीतील समृद्धी कृषी उद्योगाच्या दोन दुकानांना आग, मोदक हॉटेलजवळील बंद घराला आग, राजाबाजारमधील यादगार गणपती बांबू मार्केटमधील मालानी यांच्या बाजूला आग, वाळूज येथे जुन्या घराला आग, पहाडसिंगपूरा विद्यूत कॉलनी अमलगीर मशिदजवळील भंगाराला आग, स्टेशन रोडवरील जिंजर हॉटेलसमोर कचऱ्याला आग लागल्याच्या घटना घडल्याचे अग्निशमन विभागाने कळविले.

गवत, कचरा पेटला…

फटाके फोडताना जळालेले फटाके उडून परिसरातील कचरा, गवत पेटल्याच्या घटना शहरात घडल्या. आग लागल्याचे पाहून नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला फोन केले. हर्सूल टी पाँइटवरील एचपी पेट्रोलपंपाच्या मागे एमएसईबीच्या मैदानातील गवत फटाक्यामुळे पेटले. नागसेननगर गाडे चौक, सिडको एन-६ प्रेरणा शाळेजवळ, जालना रोडवरील एसबीओ शाळेच्या बाजूला, सिडको एन-१ प्रोझोन मॉलजवळ, छावणीतील लष्कराच्या मोकळ्या जागेत, बिबी का मकबरा पाठीमागील मोकळे मैदान, शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज मुलांच्या वसतीगृहाच्या मैदान, भाग्यनगरमधील धूत मोटारजवळ मोकळी जागा, आरटीओ ऑफीसजवळील मोकळ्या जागेतील गवताला आग लागल्याची घटना घडली. मुकूंदवाडी संघर्षनगरातील कोरड्या विहीरीतील कचऱ्यानेही पेट घेतला.

रॉकेटमुळे घराच्या गॅलरीत लागली आग

दिवाळीत रॉकेट उडविण्याचा मोह लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवरत नाही. जमिनीवरून तसेच घराच्या गच्चीवरून सोडलेले रॉकेट दूरवर जावून पडते, अशाच पेटलेले रॉकेट पडून गॅलरीत आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. गजानन महाराज मंदिर रोडवरील रिलायन्स मॉलच्या मागे घराच्या टेरेसवर आग, श्रेयनगरातील पवन गॅस गोडावून जवळील घराच्या गॅलरीमध्ये आग लागली, संबंधित नागरिकांनी माहिती देताच अग्निशमन विभागाने धाव घेऊन ही आग विझविली.

Read About : Muhurat Trading 2026- दिवाळीनिमित्त शेअर बाजारात विशेष मुहूर्त ट्रेडिंग!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.