Ad Advertisement Ad Advertisement

Mystery Case : ज्या मुलीला मृत समजून अंत्यसंस्कार केले, ती 3 वर्षांनी निघाली जिवंत; आईला व्हिडिओ कॉल

३० वर्षांची मुलगी प्रीती १३ मे २०२३ रोजी अचानक घरातून झाली होती बेपत्ता

प्रयागराज : Mystery Case उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील गंगापार भागातील लाल गोपालगंज येथून एक थक्क करणारी आणि चित्रपटाच्या कथेच्या सारखी घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने ज्या मुलीला मृत समजून तिच्यावर रीतसर अंत्यसंस्कार केले होते, ती मुलगी चक्क ३ वर्षांनंतर जिवंत असल्याचे उघड झाले आहे. ती मुलगी सध्या गुजरातमध्ये सुरक्षित असून तिने थेट व्हिडिओ कॉल करून आपल्या आईशी संवाद साधला आहे.

मे २०२३ पासून बेपत्ता होती मुलगी

मिळालेल्या माहितीनुसार, बनवारीलाल यांची ३० वर्षांची मुलगी प्रीती ही १३ मे २०२३ रोजी अचानक घरातून बेपत्ता झाली होती. आई कमला देवी आणि नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर १६ मे रोजी नवाबगंज पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. प्रदीर्घ काळ उलटूनही पोलीस तपासात काहीही निष्पन्न होत नव्हते.

दुसऱ्याच मृतदेहावर घाईगडबडीत अंत्यसंस्कार

दरम्यान, चिलुआताल नदीजवळील झुडपांमध्ये एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. गोरखपूरला पोहोचलेल्या कुटुंबीयांनी मृतदेहाचे कपडे, नाकावरील तीळ, हातावरील टॅटू आणि शरीरावरील इतर खुणांवरून ती प्रीतीच असावी असा अंदाज लावला. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात दिला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, डीएनए रिपोर्ट येण्याची वाट न पाहताच कुटुंबाने ४ ऑक्टोबर रोजी सर्व विधी पार पाडत तिच्यावर अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर तेराव्याचा विधीही आटोपला.

मुलीला जिवंत पाहून कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले असले, तरी आता एक मोठा गूढ प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबाने ज्या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते, ती नेमकी कोण होती? पोलीस आता या दिशेने तपास करत असून डीएनए रिपोर्ट आल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर येईल.

Read About : Myanmar Woman Assault Case : हैदराबादमध्ये म्यानमारच्या तरुणीला खोलीत डांबले; पतीसह 3 मित्रांवर सामूहिक लैंगिक अत्याचाराचा आरोप

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.