महाराष्ट्राची दिव्या, विदिथ अर्जुन पुरस्काराचे मानकरी
नवी दिल्ली : National Sports Awards 2026 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात डेकॅथलॉनपटू तेजस्विन शंकर, विश्वचषक विजेता नागपूरची दिव्या देशमुख आणि नाशिकचा ग्रँडमास्टर विदित गुजराती यांच्यासह १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान केला. यंदा प्रतिष्ठेच्या खेल रत्न पुरस्कारासाठी कोणत्याही खेळाडूची निवड करण्यात आली नाही.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशींचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर १७ अर्जुन पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली. यापूर्वी २०१४ मध्ये कोणत्याही खेळाडूला खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नव्हते. विश्वचषक विजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, तेजस्विन शंकर आणि महिला दुहेरी बॅडमिंटनपटू गायत्री गोपीचंद व त्रिशा जॉली यांचा अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित १७ खेळाडूंमध्ये समावेश होता. पुरस्कार या सोहळ्यात गुजराती, देशमुख, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता बॉक्सर नरेंद्र बेरवाल आणि तरुण कर्णबधिर रायफल नेमबाज धनुष श्रीकांत हे खेळाडू उपस्थित होते. अर्जुन पुरस्कारासोबत सुमारे दीड लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाते.
यंदा केवळ दोन पॅरा ॲथलीटचा गौरव
२०२४ मध्ये विक्रमी ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, त्यापैकी १७ पॅरा-ॲथलीट होते. यावेळी, अंतिम यादीत पॅरा-ॲथलीटमध्ये केवळ दोन नावांचा समावेश आहे. २०२४ च्या पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पॅरा क्लब थ्रोअर एकता भ्यान आणि २०२४ च्या पॅरा वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नेमबाज रुद्रांश खंडेलवाल यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश होता.
माजी फुटबॉलपटू अरुमनयगम यांना जीवन गौरव
१९६२ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या फुटबॉल संघाचे सदस्य आय. अरुमनयगम यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंत्रालयाने द्रोणाचार्य पुरस्कारासाठी तीन प्रशिक्षकांची निवड केली, ज्यात एम. सी. मेरी कोमच्या सपोर्ट स्टाफमध्ये काम केलेले बॉक्सिंग प्रशिक्षक छोटेलाल यादव यांचा समावेश आहे. यावर्षी पुरुष राष्ट्रीय बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक धर्मेंद्र यादव आणि कुस्ती प्रशिक्षक वीरेंद्र कुमार यांची प्रशिक्षण क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Indian Wrestling – भारतीय कुस्तीचा आलेख उंचावतोय; ‘जागतिक सुवर्णपदकाने मानसिकताच बदलली’
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.