एसीचा वापर कमी करून शहरांतील वाढती उष्णता रोखण्यासाठी नैसर्गिक शीतकरण तंत्रज्ञानाचा पर्याय
पॅरिस : Passive Cooling Technology जगभरात वाढत्या उष्णतेमुळे एअर कंडिशनर्सचा वापर प्रचंड वाढला आहे, मात्र हाच उपाय आता शहरांसाठी एक मोठी समस्या बनत चालला आहे. एसीचा अतिवापर शहरांच्या बाहेरील वातावरणातील तापमान अधिक वाढवत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आता पारंपरिक आणि आधुनिक पॅसिव्ह कूलिंग तंत्रज्ञान हाच भविष्यातील सर्वोत्तम मार्ग असल्याचे समोर आले आहे.
एसीमुळे शहरे कशी तापत आहेत?
शास्त्रज्ञांच्या मते, एसी चालू असताना तो घरातील उष्णता खेचून बाहेर फेकत असतो. यामुळे घरातील तापमान कमी होत असले, तरी शहराच्या बाहेरील हवेचे तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढते. रात्रीच्या वेळी हा प्रभाव अधिक जाणवतो, कारण शहरांमधील काँक्रीटच्या इमारती दिवसभर उष्णता शोषून घेतात आणि रात्री एसीच्या गरम हवेमुळे वातावरणातील उष्णता अधिकच कोंडली जाते, ज्याला अर्बन हीट आयलंड इफेक्ट म्हणतात.
पॅसिव्ह कूलिंग म्हणजे काय आणि ते का गरजेचे आहे?
पॅसिव्ह कूलिंग म्हणजे कोणत्याही विजेचा किंवा मेकॅनिकल उपकरणाचा (जसे की एसी किंवा कुलर) वापर न करता इमारती नैसर्गिकरीत्या थंड ठेवण्याची पद्धत. या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहे. योग्य वास्तुकलेचा वापर केल्यास इमारतींमधील एसीची गरज ८० टक्क्यांपर्यंत कमी केली जाऊ शकते. इमारतींची रचना अशी करणे, ज्यामुळे हवा सतत खेळती राहील आणि गरम हवा छताच्या बाजूने बाहेर जाईल. छतावर पांढरा किंवा उष्णतारोधक रंग लावल्याने ७० ते ८० टक्के सुर्यकिरणे परावर्तित होतात.
भविष्यासाठी शाश्वत पाऊल
आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या अंदाजानुसार, जर आपण असेच एसीवर अवलंबून राहिलो, तर २०५० पर्यंत जागतिक पातळीवर विजेचा वापर तिपटीने वाढेल. त्यामुळे भविष्यात स्मार्ट शहरांची उभारणी करताना पॅसिव्ह कूलिंग डिझाइन्सचा समावेश करणे बंधनकारक करणे गरजेचे आहे, जेणेकरून विजेचा वापर कमी होऊन पर्यावरणाचे रक्षण करता येईल.
Read About: AI Palm Reading Trend 2026- आता थेट एआय कडूनच भविष्य जाणून घेण्याची क्रेझ
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.