Ad Advertisement Ad Advertisement

Smart Shoes Technology : पावलांच्या ऊर्जेवर चालणारे स्मार्ट शूज विकसित; पार्किन्सन्स, पडण्याचा धोका ओळखण्यास मदत

Battery-Free Wearable Technology चा नवा प्रयोग; 95.4 टक्के अचूकतेने हालचाली ओळखण्याचा संशोधकांचा दावा

न्यू जर्सी : Smart Shoes Technology वैद्यकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणणारा एक अनोखा स्मार्ट शूज अमेरिकेतील संशोधकांनी विकसित केला आहे. हा बूट माणसाच्या चालण्याच्या पद्धतीचे आपोआप विश्लेषण करतो. विशेष म्हणजे, भविष्यात या तंत्रज्ञानाच्या मदतीने पार्किन्सन्स, पाठीच्या कण्याचे आजार आणि मेंदूला झालेल्या दुखापतींमुळे निर्माण होणाऱ्या हालचालींच्या विकारांवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

असे आहे संशोधन
  • बॅटरी चार्ज करण्याची गरज नाही : अमेरिकेच्या रटगर्स युनिव्हर्सिटीचे बायोमेडिकल इंजिनिअर सिमियाओ न्यु यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. या बूटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याला चार्ज करण्यासाठी कोणत्याही बॅटरीची गरज नाही. जेव्हा माणूस चालतो किंवा धावतो, तेव्हा त्याच्या पावलांच्या दाबामुळे आणि घर्षणामुळे जी बायोमेकॅनिकल ऊर्जा निर्माण होते, त्याच ऊर्जेवर यातील इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा चालते.
  • ९५ टक्के अचूकता : या बूटच्या टाचेमध्ये अत्यंत प्रगत इलेक्ट्रॉनिक्स आणि सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. हा बूट धावणे, हळू किंवा वेगाने चालणे आणि जिने चढणे यांसारख्या हालचाली ९५.४ टक्के अचूकतेने ओळखतो, तसेच पावले मोजणे आणि कॅलरीजचा अंदाज लावण्याचे कामही करतो.
  • एज एआय तंत्रज्ञान : या उपकरणात ऑनबोर्ड एआय चा वापर करण्यात आला आहे. यामुळे डेटा विश्लेषणासाठी माहिती वारंवार फोन किंवा सर्व्हरवर पाठवावी लागत नाही. बूटच्या आतच अवघ्या काही सेकंदात डेटा प्रोसेस केला जातो, ज्यामुळे विजेची मोठी बचत होते.
पार्किन्सन्स रुग्णांसाठी वरदान

पार्किन्सन्स आजार असलेल्या रुग्णांना चालताना तोल जाण्याचा आणि अचानक पडण्याचा मोठा धोका असतो. रुग्णालयात डॉक्टरांसमोर चालताना अनेक रुग्ण घाबरतात, ज्यामुळे त्यांच्या नेहमीच्या चालण्याची अचूक माहिती मिळत नाही. हा स्मार्ट बूट रुग्ण घरात किंवा दैनंदिन जीवनात कसा चालतो, यावर सतत लक्ष ठेवून त्याच्या आजाराच्या प्रगतीचा अचूक अहवाल देऊ शकतो.

Read About: AI Palm Reading Trend 2026- आता थेट एआय कडूनच भविष्य जाणून घेण्याची क्रेझ
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.