अमेरिकेतील स्टार्टअप कंपनीकडून भरती सुरू; दररोज ४ ते ६ तास रोबोट डॉगसोबत फिरावे लागणार
सॅन फ्रान्सिस्को : Robot Dog Walking Job तंत्रज्ञानातील वेगाने होणाऱ्या बदलांमुळे नोकरीच्या बाजारपेठेत आश्चर्यकारक नव्या संधी निर्माण होत आहेत. आतापर्यंत पाळीव श्वानांना घराबाहेर फिरायला नेण्यासाठी लोकांना पैसे दिले जात होते; मात्र आता यांत्रिक म्हणजेच रोबोट डॉगला रस्त्यावर फिरवण्यासाठी एका अमेरिकन कंपनीने नोकरभरती सुरू केली आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एका स्टार्टअप कंपनीने हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
दररोज ४ ते ६ तासांचे काम
या नोकरीसाठी कंपनी उमेदवारांना दर तासाला २० डॉलर्स (सुमारे १,७०० रुपये) इतके आकर्षक मानधन देत आहे. निवड झालेल्या व्यक्तीला (रोबोट ऑपरेटर) दररोज अंदाजे ४ ते ६ तास या रोबोट डॉगला सोबत घेऊन शहरातील रस्त्यांवरून चालावे लागेल.
तांत्रिक शिक्षणाची आवश्यकता नाही, कंपनी देणार मोफत ट्रेनिंग
विशेष म्हणजे, या पदासाठी उमेदवाराला रोबोटिक्सचे कोणतेही ज्ञान असण्याची किंवा विशिष्ट पदवी धारण करण्याची अट नाही. या क्षेत्राचा कोणताही अनुभव नसलेली व्यक्तीही या कामासाठी अर्ज करू शकते. कंपनीकडून ऑपरेटरला हे यंत्र हाताळण्याचे संपूर्ण मोफत प्रशिक्षण दिले जाईल आणि त्या ट्रेनिंगच्या कालावधीचे पैसेही उमेदवाराला मिळतील.
नेमकी काय काळजी घ्यावी लागेल?
हा रोबोट डॉग साधारण १५ किलो वजनाचा असून त्याची रचना बऱ्याच अंशी खऱ्या श्वानासारखी करण्यात आली आहे. रस्त्यावरून फिरताना या यांत्रिक श्वानाची हालचाल, त्याचा आजूबाजूच्या परिसराशी होणारा संपर्क आणि सायबर सुरक्षितता यांवर ऑपरेटरला बारीक लक्ष ठेवावे लागेल.
Read About : SBI Q2 Results – एसबीआयच्या नफ्यात 14.28 टक्क्यांची वाढ; दुसऱ्या तिमाहीत 23,037 कोटींचा नफा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.