Ad Advertisement Ad Advertisement

Sambhajinagar Property Tax Penalty Waiver – 31 डिसेंबरपर्यंत थकित मालमत्ता करांवरील दंड माफ

Sambhajinagar Property Tax Penalty Waiver शहरवासियांना मनपाची दिवाळी भेट : ८०० कोटींची थकबाकी होणार वसूल

छत्रपती संभाजीनगर : Sambhajinagar Property Tax Penalty Waiver : गुंठेवारीतील बेटरमेंट चार्जेस, दंड व प्रशमन शुल्क माफ करण्याचा घेतलेला निर्णय नागरिकांसह महापालिकेसाठी फायदेशीर ठरला. त्याच धर्तीवर महापालिकेने थकित मालमत्ता करावरील दंड (शास्ती) १०० टक्के माफ करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने बुधवारी (दि.४) घेतला. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंतच ही सवलत राहणार आहे, त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही, असेही महापौर समीर राजूरकर यांनी स्पष्ट केले. पदाधिकारी व मनपा प्रशासनाचा हा निर्णय शहरवासियांसाठी दिवाळी भेट ठरला आहे.

महापालिका थकित मालमत्ता करावर वर्षाला २४ टक्के चक्रवाढ व्याज आकारते. त्यामुळे शास्तीची रक्कम जास्त होते. वर्षानुवर्षे कर न भरणाऱ्यांच्या मालमत्ता कराची थकित रक्कम वाढत जाते. तत्कालीन मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी जुलै ते ऑगस्ट २०२५ या कालावधीसाठी शास्ती से आझादी ही योजना राबविली होती. त्यात त्यांनी थकित मालमत्तांधारकांना ९५ टक्के दंड माफ केला होता. तर ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२५ पर्यंत शास्ती से मुक्ती या योजनेअंतर्गत ७५ टक्के शास्ती माफ केली होती. मात्र योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहता, सप्टेंबरपर्यंत ९५ टक्के शास्ती माफी देण्यात आली होती. या योजनांमुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक मालमत्ता कर जमा करण्याचा विक्रम नोंदवल्या गेला. जानेवारी २०२६ मध्ये पदाधिकाऱ्यांनी मनपाचा कारभार हाती घेतल्यानंतर नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू केले आहे. गुंठेवारीअंतर्गत अनधिकृत भूखंडासाठी बेटरमेंट चार्जेस, तसेच बांधीव घरांसाठीच्या गुंठेवारी शुल्कातील जास्तीच्या बांधकामावरील दंड व प्रशमन शुल्कात माफीचा निर्णय घेतला. त्यामुळे मनपाच्या तिजोरीत १२५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. गुंठेवारीची मुदत संपल्यानंतर शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

धनत्रयोदशीपासून योजनेचा मिळणार लाभ

या निर्णयाबाबत आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले की, शहरात ३.२५ लाख मालमत्तांची नोंद असून, १,७८.,१५५ मालमत्तांधारकांकडे थकबाकी आहे. ही थकबाकी सुमारे १२७० कोटी आहे. थकित कर वसूल करून, मालमत्ताधारकांना नियमित कर भरता यावा, यासाठी थकबाकीतील शास्तीची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धनोत्रयोदशीपासून (दि.६) नोव्हेंबरपासून ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ही माफी मिळेल.

३०० कोटी रुपये शास्ती

शहरातील मालमत्ताधारकांकडे सुमारे ८०० कोटी कर थकित आहे. त्यावर सुमारे ३०० कोटी रुपये शास्ती आहे. तर चालू आर्थिक वर्षातील मागणी १७६ कोटी रुपये आहे. शास्ती १०० टक्के माफ केल्याने, महापालिकेचे ३०० कोटींचे नुकसान होत आहे, मात्र ही सवलत दिल्याने आतापर्यंत महापालिकेला मिळत नसलेले ८०० कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

योजनेला मुदतवाढ दिली जाणार नाही : समीर राजूरकर, महापौर.

शहरातील पावणे दोन लाख थकबाकीदार मालमत्ताधारकांना दिलासा देणारा हा निर्णय आहे. ३१ डिसेंबरपर्यंतच थकबाकीवरील शास्ती १०० टक्के माफ करण्यात आली आहे. त्यानंतर या योजनेला मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे थकबाकीदार मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घेत, आपला मालमत्ता कर पूर्णपणे क्लिअर करून घ्यावा. १०० टक्के शास्ती माफ करण्याचा निर्णय घेणारी छत्रपती संभाजीनगर ही राज्यातील पहिली महापालिका आहे.: समीर राजूरकर, महापौर

Read About: Shraddha Kapoor Eetha Trailer – ‘नाचता नाचता मरेन, पण इतिहास घडवून जाईन’

E-Paper: Punyanagari E-Paperक्राइम

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.