सौदी अरेबियावर हुथी बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला! रियाध विमानतळावर १३ जणांचा मृत्यू
रियाध : Saudi Arabia Missile Attack : यमनमधील हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाधवर घातक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचे एकापाठोपाठ एक भीषण हल्ले चढवल्यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत प्रचंड खळबळ उडाली आहे. या वाढत्या हल्ल्यांच्या आणि सुरक्षेच्या कारणास्तव सौदीचा राजकुमार मोहम्मद बिन सलमान हे भूमिगत झाले असून, ते बंकर असलेल्या अत्यंत सुरक्षित राजवाड्यांमध्ये हलवले जात असल्याचे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिले आहे. गेल्या मंगळवारपासून राजकुमार सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत.शनिवारी रियाध येथील ‘किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हुथी विद्रोहींनी डागलेले क्षेपणास्त्र थेट पॅसेंजर टर्मिनलवर धडकले.
या भीषण हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सौदीचे नागरिक, १ अमेरिकन, १ भारतीय, बांगलादेशी आणि इतर देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. रविवारी पुन्हा एकदा याच विमानतळाला लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये १ पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले. सौदी अरेबियावर गेल्या १० वर्षांत झालेला हा सर्वात प्राणघातक दहशतवादी हल्ला मानला जात आहे.
राजधानीत भीतीचे वातावरण; शाळा बंद
सतत होणाऱ्या या हवाई हल्ल्यांमुळे राजधानी रियाधमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. तसेच, ब्रिटन आणि युरोपियन युनियनने आपल्या नागरिकांना सौदी अरेबिया, विशेषत: रियाध विमानतळ परिसरात जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
ट्रम्प यांची प्रतिहल्ल्याची धमकी
हुथींच्या या वाढत्या आक्रमकतेवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदीचे राजकुमार एमबीएस हे आपले चांगले मित्र असल्याचे सांगत, ‘हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही’ असा इशारा दिला आहे. अमेरिका सौदीच्या मदतीसाठी या युद्धात थेट उतरून प्रतिहल्ला करू शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
युरोपियन युनियन आणि ब्रिटनकडून निषेध : युकेचे संरक्षण मंत्री वेस स्ट्रीटिंग आणि ईयू प्रमुख उर्सुला वॉन डेर लेन यांनी या हल्ल्यांना ‘नागरी क्षेत्रावरील भ्याड हल्ला’ असे म्हणत हुथी विद्रोहींचा तीव्र निषेध केला आहे.
हुथींचा इशारा
हुथी लष्कराचे प्रवक्ते याह्या सारी यांनी या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारत स्पष्ट केले की, त्यांनी गेल्या २४ तासांत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी ४ मोठी ऑपरेशन्स केली आहेत. सौदीची सर्व विमानतळे आणि तेल/ऊर्जा प्रकल्प त्यांच्या निशाण्यावर असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
Read About : Pakistan Emergency : खैबर पख्तूनख्वामध्ये आणीबाणी; कराचीमध्ये आंदोलनांवर निर्बंध, राजकीय तणाव वाढला
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.