Ad Advertisement Ad Advertisement

Nanded finance office vandalism – नांदेड जिल्ह्यात फायनान्सच्या कार्यालयाची तोडफोड

चौघांविरुद्ध पोलिसांत कारवाई : श्रीराम आणि बजाज फायनान्सच्या कार्यालयावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्याचा हल्ला

Nanded finance office vandalism लोहा : यंदा राज्यात विशेषत: मराठवाड्यात पाऊस झाला नसल्याने राज्य सरकारकडून कोरडा दुष्काळ जाहीर केला असताना सातत्याने खासगी कर्ज वाटप करणाऱ्या फायनन्स कंपन्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्ज वसुली करत आहेत. त्याविरुद्ध क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर यांना फायनन्स कंपनी त्रास देत असतील तर त्यांचे कार्यालय फोडू असा इशारा देण्यात आला होता.

त्या अनुषंगाने लोहा (जि. नांदेड) येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील श्रीराम फायनन्स व बजाज फायनन्स कंपनीचे कार्यालय फोडून नासधूस केल्याची घटना सोमवारी दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. सदर घटनेप्रकरणी चौघांविरुद्ध लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यात कोरडा दुष्काळाच्या परिस्थितीत खासगी वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्या दुष्काळात शेतकऱ्यांच्या दारात जाऊन जबरदस्तीने कर्ज वसुली करत आहेत. कर्ज वसुलीसाठी महिलांना त्रास द्याल तर एकही फायनन्स कंपनीचे कार्यालय शिल्लक ठेवणार नाही असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोहा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. बाळासाहेब जाधव सुनेगावकर व कार्यकर्त्यांनी शहरातील श्रीराम फायनान्स व बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयांची तोडफोड केली.

नांदेड येथील चंद्रकांत शिंदे व लातूर येथील दत्तात्रय कुंभार या दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यास प्रतिसाद देत लोहा येथे श्रीराम व बजाज फायनन्स कंपनी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे, जिल्हा संघटक कैलास पाटील, तालुकाप्रमुख पांडुरंग पवार यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फायनान्स कंपन्यांकडून जबरदस्ती वसुली

शेतकऱ्यांचे दुष्काळामुळे प्रचंड नुकसान झाले. अत्यंत वाईट अवस्था शेतकरी, शेतमजुरांची असताना फायनान्स कंपन्या जबरदस्ती वसुली करत आहेत. सदरील वसुली बंद करावी. तसेच सरकारने एक वर्षाचे व्याज बंद करावे व शेतकऱ्यांचे सिबिल कोर खराब करु नये. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रा. बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.

Read About : Three massive black holes – विश्वाच्या बालपणीची तीन कृष्णविवरे सापडली

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.