Ad Advertisement Ad Advertisement

SIR Voter List Revision – एसआयआरमधून वगळलेल्या मतदारांना अजून एक संधी

महाराष्ट्रासह ७ राज्यांसाठी आयोगाचा मोठा निर्णय

SIR Voter List Revision : नवी दिल्ली : देशभरात राबवल्या जात असलेल्या ‘मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन’ (एसआयआर) मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रासह ७ राज्यांतील मतदारांना नाव नोंदणीसाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने शुक्रवारी घेतला. ‘एसआयआर’दरम्यान गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि डुप्लिकेट (एएसडीडी) म्हणून अधोरेखित केलेल्या आणि ज्यांचे गणना फॉर्म जारी केले. परंतु, ते अद्यापही मिळाले नाहीत, अशा नागरिकांना आता पुन्हा नाव नोंदणी करता येणार आहे.


‘एसआयआर’वर देशातील विरोधी पक्ष टीका करीत असतानाच आता निवडणूक आयोगाने मतदारांना नाव नोंदणी करण्यासाठी आणखी एक संधी दिली आहे. यामुळे नावे वगळलेल्या मतदारांना पुन्हा एक संधी मिळणार आहे. निवडणूक आयोगाचे हे निर्देश राजधानी दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, आंध्र प्रदेश, झारखंड, तेलंगणा आणि नागालँड या राज्यांना लागू आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कोणताही पात्र मतदार अंतिम मतदार यादीत समाविष्ट होण्याच्या संधीपासून वंचित राहणार नाही. तसेच दुबार नोंदणी रोखली जाऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना एक देखरेख यंत्रणा स्थापन करण्यास सांगितले.

विलंबाने दिलेली कबुली-काँग्रेस

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वरील निर्णयावर काँग्रेसने टीका केली. चुकीच्या पद्धतीने नावे वगळण्यात आली होती. याची ही विलंबाने दिलेली कबुली असल्याचा आरोप काँग्रेसने केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पायउतार व्हावे आणि मतदार याद्यांची ही विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) मोहीम तात्काळ स्थगित करण्यात यावी, या आपल्या मागणीचा पुनरुच्चार काँग्रेसने केला. एसआयआरमुळे १३ कोटींहून अधिक भारतीयांचा मतदानाचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला गेला. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. म्हणून निवडणूक आयोगाने आता यूटर्न घेतल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी केली.

Read About : ECI Form 6 online voter registration – फॉर्म 6 आणि घोषणापत्र आता स्वतंत्रपणे भरावे लागणार

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.