डेटा वापरत नसलेल्या ग्राहकांना दिलासा, ३० दिवस, मासिक नूतनीकरण आणि दीर्घ मुदतीचे Voice-SMS Plans बंधनकारक
नवी दिल्ली : TRAI New Rules मोबाईल ग्राहकांसाठी टेलिकॉम रेग्युलेटर (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) ने एक मोठा बदल केला आहे. आता टेलिकॉम कंपन्यांना अशा ग्राहकांसाठी फक्त वॉयस कॉल आणि एसएमएस सुविधा असलेले विशेष टॅरिफ वाउचर उपलब्ध करून द्यावे लागतील, ज्यांना मोबाईल डेटाची गरज नाही.
ट्राय ने यासाठी दूरसंचार ग्राहक संरक्षण (तेरावी दुरुस्ती) नियमन, २०२६ जारी केले आहे. या नवीन नियमांमुळे डेटा प्लॅन न वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि खिशाला परवडणारे रिचार्ज निवडणे सोपे होणार आहे.
या ग्राहकांना होणार फायदा
ट्रायच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या व्यवस्थेत फक्त वॉयस आणि एसएमएस सुविधा देणारे रिचार्ज प्लॅन्स मर्यादित होते. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना कमी कालावधीचे आणि स्वस्त रिचार्ज पर्याय मिळण्यात अडचणी येत होत्या. हीच अडचण दूर करण्यासाठी रेग्युलेटरने हा निर्णय घेतला आहे. आता कंपन्यांना वॉयस आणि एसएमएससाठी वाजवी दरात स्वतंत्र रिचार्ज द्यावे लागतील.
असे असतील नवीन रिचार्ज प्लॅन्स
कंपन्यांना ३० दिवसांची वैधता असलेले आणि ३० दिवसांपेक्षा कमी वैधता असलेले फक्त वॉयस-एसएमएस प्लॅन्स आणावे लागतील.
कंपन्यांना असा एक प्लॅन देखील द्यावा लागेल, ज्याची वैधता दर महिन्याला त्याच तारखेला न्यूतणीकरण करता येईल.
याशिवाय, ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा किमान एक वॉयस-एसएमएस प्लॅन देणेही कंपन्यांना बंधनकारक असेल.
या नवीन नियमांमुळे खासकरून कमी उत्पन्न असलेल्या आणि मोबाईलवर इंटरनेट किंवा डेटाचा वापर न करणाऱ्या सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ते आता आपल्या आर्थिक क्षमतेनुसार योग्य रिचार्ज निवडू शकतील.
Read About : China AI Digital face Licensing : आपला चेहरा विका नि पैसे कमवा!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.