धुळे, अहिल्यानगरमध्ये होणार भरती; देशभरातील उमेदवारांसाठी १३९ पदे
छत्रपती संभाजीनगर – Recruitment for Ex-servicemen Retired Women : भारतीय सैन्यातील प्रादेशिक सेनेअंतर्गत (टेरिटोरिअल आर्मी) ‘१३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इकोलॉजिकल महार’ मध्ये भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भरती देशभरातील माजी सैनिक, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसेच राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी आहे.
या भरतीतून सैनिक आणि ट्रेड्समन पदाच्या एकूण १३९ जागा भरल्या जाणार आहेत. नोकरीची दुसरी संधी शोधत असलेल्या पात्र उमेदवारांसाठी हा एक उत्तम पर्याय असून, यासाठी धुळे आणि अहिल्यानगर येथे ऑक्टोबर महिन्यात भरतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल डी के सिंह यांनी मंगळवारी (दि. २२) प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल.
अशी आहे पदांची माहिती :
सैनिक (जनरल ड्युटी): १२९ जागा (अखिल भारतीय स्तरावर)
ट्रेड्समन : १० जागा (क्लार्क-१, शेफ कम्युनिटी-१, वॉशरमन-१)
कुठे आणि कधी होणार भरती?
टप्पा १ – ५ ते ८ ऑक्टोबर २०२६, पहाटे ५ वाजल्यापासून
धुळे : राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) गट ६ मैदान, साक्री रोड, धुळे.
टप्पा २ – १२ ते १५ ऑक्टोबर २०२६, पहाटे ५ वाजल्यापासून
अहिल्यानगर : मेकॅनिकल इन्फंट्री सेंटर अँड स्कूल, हरपाळ स्टेडियम, गेट ४ अ, सोलापूर रोड, अहिल्यानगर.
अशी आहे पात्रता
- सशस्त्र दलातील पेन्शनधारक माजी सैनिक.
- वन विभागात किमान २० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या माजी महिला कर्मचारी.
- सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ५ वर्षांच्या आत या भरतीत सहभागी होणे बंधनकारक आहे.
- उमेदवारांची वैद्यकीय श्रेणी शेप-१ असावी आणि चारित्र्य उत्तम असावे. त्यांच्यावर कोणताही फौजदारी किंवा दिवाणी खटला नसावा.
अशी असेल निवड प्रक्रिया
माजी सैनिकांसाठी : प्राथमिक कागदपत्र तपासणी, १ मैल धावणे, ९ फूट खड्डा उडी, पुल-अप्स, बॅलन्स बीम, मुलाखत आणि मेडिकल तपासणी.
महिला कर्मचाऱ्यांसाठी : प्राथमिक कागदपत्र तपासणी, मुलाखत, रोपवाटिका आणि वनरोपण कामाची कौशल्य चाचणी आणि मेडिकल तपासणी.
अत्यंत महत्त्वाचे, हे पण वाचा!
- भरतीसाठी येताना पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ), डिस्चार्ज बुक, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड (मूळ आणि साक्षांकित प्रत), शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि पासपोर्ट साईजचे १० कलर फोटो सोबत आणावेत.
- उमेदवारांना शिपाई म्हणून नियुक्त केले जाईल. सुरुवातीला ही नियुक्ती २ वर्षांसाठी असेल आणि कामगिरीच्या आधारे त्यात १ वर्षाची वाढ केली जाऊ शकते.
- भरती दरम्यान मोबाईल फोन आणण्यास सक्त मनाई आहे.
- ही भरती प्रक्रिया पूर्णपणे मोफत आणि पारदर्शक आहे. कोणत्याही दलालाला पैसे देऊ नका, अन्यथा उमेदवारी रद्द होऊन कायदेशीर कारवाई होईल.
- अधिक माहिती किंवा शंका असल्यास उमेदवारांना ९१६८१६८१३६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल.
Read About: Recruitment Exam Task Force : उच्चस्तरीय भरती परीक्षांसाठी २४७ विद्यार्थ्यांशी थेट संवाद; शेकडो सूचनांचा सखोल आढावा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.