Ad Advertisement Ad Advertisement

Meerut Murder Case : पतीची हत्या करणाऱ्या रविता आणि प्रियकराला फाशीची शिक्षा; कोर्टाचा मोठा निर्णय

पतीची गळा आवळून हत्या केल्यानंतर सर्पदंशाचा बनाव; अमित कश्यप हत्या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

मेरठ : Meerut Murder Case उत्तर प्रदेशातील मेरठ येथे प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या करणाऱ्या रविता आणि तिचा प्रियकर अमरदीप यांना स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जयवीर सिंह नागर यांनी हा निकाल दिला.

न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान दोन्ही आरोपी तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले गेले होते. शिक्षा ऐकल्यानंतर रविताने, माझी तीन लहान मुले आहेत, त्यांचा सांभाळ केला जावा, अशी विनंती केली. तर अमरदीपने आपले वृद्ध आई-वडील एकटे असल्याचे सांगत त्यांच्या देखभालीची मागणी केली. यानंतर दोघेही ढसाढसा रडू लागले.

ही खूनाची घटना १७ एप्रिल २०२५ रोजी घडली होती. रविताने प्रियकर अमरदीपच्या मदतीने पती अमित कश्यपची गळा आवळून हत्या केली होती. हा खून सर्पदंशाने झाला आहे असे भासवण्यासाठी त्यांनी मृतदेहाजवळ एक सापही ठेवला होता. परंतु, शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनेच्या ६० दिवसांत आरोपपत्र दाखल केले होते.

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.