Ad Advertisement Ad Advertisement

AstroSage AI action plan – भविष्य समजण्यासोबत आता पुढे काय करायचे, हेही कळणार – 2026

ॲस्ट्रोसाइट’चा नवा प्रयोग, ज्योतिषाच्या मदतीने ७, १४ आणि २१ दिवसांचा कृती आराखडा

नवी दिल्ली : AstroSage AI action plan – ‘नोकरी बदलावी का?’, ‘करिअरमध्ये पुढे काय करावे?’, ‘आर्थिक स्थैर्य कधी मिळेल?’ असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. मात्र, या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर पुढे नेमके काय करायचे, हा प्रश्नही महत्त्वाचा असतो. ही गरज लक्षात घेऊन ‘ॲस्ट्रोसाइट’ या भारतीय डिजिटल मंचाने वैदिक ज्योतिषशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने मार्गदर्शनाची नवी पद्धत सुरू केली आहे. येथे केवळ भविष्य सांगितले जात नाहीतर व्यक्तीच्या परिस्थितीनुसार ७, १४ किंवा २१ दिवसांचा वैयक्तिक कृती आराखडा तयार करून दिला जातो.

तंत्रज्ञान क्षेत्रात १६ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या विवेक व्यंकटेश यांनी या मंचाची स्थापना केली आहे. व्यक्तीची जन्मकुंडली, तिचे प्रश्न आणि यापूर्वी झालेला संवाद यांचा एकत्रित विचार करून पुढील मार्गदर्शन केले जाते.

ज्योतिषाचा सल्ला घेताना प्रत्येक वेळी जुनी माहिती पुन्हा सांगावी लागू शकते. ‘ॲस्ट्रोसाइट’मध्ये आधीच्या संवादातील माहिती लक्षात ठेवण्याची सुविधा आहे. त्यामुळे व्यक्तीने यापूर्वी कोणती समस्या मांडली, कोणते पर्याय विचारात घेतले आणि कोणती पावले उचलली, याचा संदर्भ पुढील संवादात घेता येतो.

भविष्यवाणीपेक्षा कृतीवर भर

एखाद्या व्यक्तीला नोकरी बदलायची असल्यास तिची सध्याची अडचण, उपलब्ध पर्याय, आर्थिक तयारी आणि पुढील पावले यांचा विचार करून कृती आराखडा तयार केला जाऊ शकतो ‘ॲस्ट्रोसाइट’च्या मते, ज्योतिष हे अंतिम निर्णय देणारे माध्यम नसून विचार, कृतीसाठी एक मार्गदर्शक चौकट ठरू शकते.

करिअर, विवाह, आर्थिक किंवा आरोग्यविषयक निर्णय घेताना व्यावहारिक माहिती, स्वत:चा विचार आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा सल्लाही महत्त्वाचा आहे.

विविध विषयांवर सविस्तर अहवाल
  • कपनीच्या माहितीनुसार, आतापर्यंत ७० हजारांहून अधिक सल्लामसलतींचा अनुभव या पद्धतीच्या विकासासाठी वापरण्यात आला आहे. जन्मकुंडली, करिअर, विवाह जुळवणी, नातेसंबंध, आर्थिक स्थैर्य तसेच संपत्ती आणि जीवनशैली अशा विषयांवर सविस्तर अहवाल उपलब्ध आहेत.
  • सध्या ‘ॲस्ट्रोसाइट’ची सेवा संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लवकरच अँड्रॉइड आणि त्यानंतर आयओएससाठी भ्रमणध्वनी सेवा सुरू करण्याची योजना असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
  • भविष्यात काय घडेल, एवढेच सांगण्याऐवजी आजपासून काय करता येईल, याची दिशा देण्याचा प्रयत्न ‘ॲस्ट्रोसाइट’ने केला आहे. भविष्य जाणून घेण्यासोबतच पुढचे पाऊल ठरवण्याचा हा प्रयोग आहे.

Read About: Language Preservation – साठी AI ची डिजिटल संजीवनी; स्थानिक समुदायांकडून अल्पसंख्याक भाषा जपण्याचा नवा मार्ग
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.