मेंदूतील रक्ताच्या गाठी काढून सूज कमी करण्यासाठी कवटीचा भाग तात्पुरता काढला
नवी दिल्ली : Skull Reconstruction Surgery दिल्लीतील द्वारका येथील मनिपाल रुग्णालयातील डॉक्टरांनी एका २७ वर्षीय तरुणाला जीवदान दिले आहे. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या या तरुणाच्या मेंदूला मोठी इजा झाली होती. त्याच्या मेंदूच्या दोन्ही बाजूंना अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता आणि मेंदूला प्रचंड सूज आली होती. डॉ. अनुराग सक्सेना, क्लस्टर हेड -दिल्ली एनसीआर, न्यूरोसर्जरी यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आणीबाणीच्या परिस्थितीत तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
दोन टप्प्यांत पार पडली शस्त्रक्रिया
पहिली शस्त्रक्रिया (रक्ताच्या गाठी काढणे) : मेंदूची सूज इतकी वाढली होती की कवटीच्या आत रक्ताभिसरण थांबण्याचा आणि जीव जाण्याचा धोका होता. प्रेशर कुकरमध्ये जसा दाब निर्माण होतो, तसाच दाब कवटीच्या आत तयार झाला होता. हा दाब कमी करण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून रक्ताच्या गाठी काढल्या आणि मेंदूला सूज येऊन पसरण्यासाठी जागेची गरज असल्याने रुग्णाच्या कवटीचा एक भाग तात्पुरता काढून बाजूला ठेवला.
दुसरी शस्त्रक्रिया (कवटीची पुनर्रचना) : रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर आणि मेंदूची सूज पूर्णपणे ओसरल्यानंतर, डॉक्टरांनी दुसऱ्या शस्त्रक्रियेदरम्यान पूर्वी काढून ठेवलेला त्याच्याच खोपडीचा हाडाचा भाग पुन्हा पूर्ववत बसवून खोपडीची यशस्वी पुनर्रचना केली.
गोल्डन आवरचे महत्त्व
रुग्णालयाचे संचालक गुरकिरत सिंग यांनी सांगितले की, गंभीर अपघातानंतरचा पहिला तास (गोल्डन आवर) रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्यामुळेच या तरुणाचे प्राण वाचू शकले. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
Read About : Gorakhpur Rabies Scare : गोरखपूरमध्ये गायीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ; दूध आणि चहा प्यायलेल्या 500 जणांना रेबीजची लस
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.