Ad Advertisement Ad Advertisement

Healthcare Price Control – सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी !

आरोग्य सुविधांच्या किमतींवर प्रभावी नियंत्रण आणण्याचे केंद्राचे निर्देश

नवी दिल्ली : Healthcare Price Control आरोग्यसेवा, औषधे आणि वैद्यकीय चाचण्यांचे वाढते दर नियंत्रित करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोर निर्देश जारी केले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून, क्लिनिकल आस्थापनांच्या नियमांचे कठोर पालन सुनिश्चित करण्याचे आणि रुग्णांना पारदर्शक दरात वैद्यकीय सेवा मिळवून देण्याचे आवाहन केले आहे.

सर्व रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांनी त्यांच्या सेवांचे आणि उपचारांचे दर सुवाच्य फळीवर ठळक अक्षरात आणि सहज दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पारदर्शक किमतींमुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना उपचारांचा खर्च आधीच समजेल, ज्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना होणारी आर्थिक लूट थांबण्यास मदत होईल.

नियम आणि कायदे

हे निर्देश ‘क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट (रजिस्ट्रेशन ॲण्ड रेग्युलेशन) रूल्स, २०१०’ आणि ‘क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट (सेंट्रल गव्हर्नमेंट) रूल्स, २०१२’ अंतर्गत जारी करण्यात आले आहेत. ज्या राज्यांमध्ये हे कायदे लागू आहेत, तिथे दर फलक ठळकपणे दर्शवले जावेत, असे सांगण्यात आले आहे.

परदेशातून उपचारासाठी भारतात येणाऱ्या परदेशी रुग्णांसाठीही उपचार आणि पॅकेजचे दर पारदर्शक पद्धतीने प्रदर्शित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे भारताची वैद्यकीय पर्यटन क्षेत्रातील प्रतिमा अधिक उजळून निघेल. केंद्राच्या या महत्त्वपूर्ण पावलामुळे आरोग्य क्षेत्रातील मनमानी कारभाराला आळा बसेल आणि सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Read About : Madagascar Albinism Attacks : मादागास्करमध्ये डोळ्यांसाठी ‘अल्बिनिझम’ असलेल्या १३ मुलांचे हत्यासत्र
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.