Ad Advertisement Ad Advertisement

Panchkula School Attack : तिसरीतील 8 वर्षांच्या मुलाचा केजीतील 6 वर्षांच्या चिमुरडीवर वर्गातच जीवघेणा हल्ला; मुलीची प्रकृती चिंताजनक

हरियाणातील शाळेतील धक्कादायक घटना; सीसीटीव्हीत हल्ल्याचे दृश्य कैद

पंचकुला – Panchkula School Attack हरियाणातील पंचकुला येथून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथील सेक्टर-२० मधील एका शाळेत तिसरीत शिकणाऱ्या एका ८ वर्षांच्या मुलाने केजी मधील ६ वर्षांच्या चिमुरडीवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी शाळेच्या आवारातच घडली होती.

फसवणूक करून पहिल्या मजल्यावर नेले

आरोपी मुलाने तुझे बाबा तुला खाली बोलवत आहेत असे खोटे सांगून मुलीला शाळेच्या पहिल्या मजल्यावरील एका रिकाम्या वर्गखोलीत नेले. तिथे नेऊन त्या मुलाने मुलीचे केस पकडले आणि तिचे डोके वर्गखोलीतील डेस्क, दगड आणि तिथे असलेल्या कुंडीवर अनेकवेळा निर्घृणपणे आदळले

बेशुद्ध झाल्यावरही मारहाण आणि फरफटत नेणे

शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही धक्कादायक घटना कैद झाली आहे. चिमुरडी रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि बेशुद्ध झाली, तरीही तो मुलगा तिच्यावर लाथाबुक्क्यांनी वार करत राहिला आणि तिला केसाला धरून फरफटत नेले.

चंदीगड मध्ये उपचार

जोरदार हल्ल्यांमुळे चिमुरडीच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर ३५ तासांनी ती शुद्धीत आली असून तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. सध्या तिच्यावर चंदीगड येथील पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तपास आणि शाळा प्रशासनावर कारवाई

या घटनेनंतर हरियाणाचे शिक्षण मंत्री महिपाल ढांडा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यालय स्तरावर एक उच्चस्तरीय तपास समिती स्थापन केली आहे. शाळा सुटल्यानंतर सीसीटीव्ही निरीक्षणात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी शाळा प्रशासनाची चौकशी केली जात आहे. तसेच, पोलीस जुवेनाईल जस्टिस बोर्डाच्या नियमांनुसार आरोपी मुलाचे वैद्यकीय आणि मानसिक मूल्यमापन करत आहेत

Read About : Binance Crypto Hack – क्रिप्टो जगतातील सर्वात मोठा दरोडा! ‘बायनान्स’मधून 6.3 अब्ज डॉलर लंपास
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.