Ad Advertisement Ad Advertisement

justice-ravindra-ghuge-felicitation-aurangabad-high-court – औरंगाबादसह येथील हायकोर्ट माझी कर्मभूमी ; हार्डवर्क इथेच शिकलो त्याशिवाय पर्याय नाहीच

दुष्काळामुळे कार्यक्रम साध्या सत्कराने; कार्यक्रमात होणारा भव्यदिव्य खर्च व नंतर होणाऱ्या सुरूची भोंजचा खर्च दुष्काळग्रस्तांना दिला जाणार

छत्रपती संभाजीनगर : justice-ravindra-ghuge-felicitation-aurangabad-high-court औरंगाबाद हायकोर्ट ही माझी कर्मभूमी आहे. मी इथेच शिकलो, घडलो. या भूमीने खूप दिले. कष्ट करायला इथेच शिकलो, त्यामुळे त्या कष्टांना दुसरा पर्याय नाही,’ असे भावोद्गार कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी काढले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठाच्या वकील संघातर्फे शनिवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना न्यायमूर्ती घुगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.सिडको परिसरातील एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एन. बी. सूर्यवंशी, औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. के. कदम, उपाध्यक्ष तसेच वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी न्यायमूर्ती घुगे यांनी औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती म्हणून काम करतानाच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच औरंगाबादमध्ये वकिलीचे शिक्षण घेत असताना एमपी लॉ कॉलेजमधील अनुभव आणि तेथील जडणघडणीच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या. औरंगाबादच्या न्यायालयीन क्षेत्राशी असलेले आपले भावनिक नाते त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
कोल्हापुरातील बालपण नंतर औरंगाबाद मधील शिक्षण लॉ कॉलेज आणि त्यानंतर वकिली पेशंट व न्यायमूर्ती ची भूमिका या सगळ्या भूमिका निभावताना आलेले अनुभव आणि मी कसा घडत गेलो याविषयी त्यांनी मोठ्या मार्मिक पद्धतीत आणि मिश्किल पद्धतीतही विविध मांडणी केली. कोलकाता येथील हायकोर्टात मुख्य न्यायाधीश म्हणून मी स्टेनोग्राफरला बसून डिक्टेशन घेण्याची पद्धत सुरू केली याशिवाय सुट्टीचे कोर्टही तेथे सुरू केले जी सुट्टी दुर्गाष्टमीच्या आणि दशहराच्या काळात असायची त्या काळात मी तेथे सुट्टीचे कोर्ट सुरू केले याशिवाय पोर्ट ब्लेअर येथे देखील चीफ जस्टीस जातो आणि तेथे बेंच तयार करतो आणि सुनावणी देखील घेतो करतो ही पद्धत सुरू केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले काम करत असताना जो प्रामाणिकपणा कष्ट आणि बदल अपेक्षित आहे न्यायदान करण्यासाठी तो आपण केला असे त्यांनी आवर्जून नमूद केले याशिवाय भविष्यात काही गोष्टी अजून करायचे आहेत असे सांगून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

या मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना….

ज्येष्ठ वकील आर.एन.धोरडे, अमरजीत सिंग गिरासे, सुजित जोशी, राजेंद्र गोडबोले, श्रीकांत अद्वंत यांनी न्या. घुगे यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. वकिल संघाचे अध्यक्ष प्रास्ताविक एस. के.कदम यांनी केले. मानपत्र वाचन संभाजी टोपे यांनी केले. सुमारे दहा हून अधिक विविध न्यायालायचे वकिल संघांनी न्या. घुगे यांचा सत्कार केला. यात कामगार,इंडस्टट्री, कुटुंब, मॅट, जिल्हा न्यायालय आणि इतरांचा समावेश होता.

दुष्काळामुळे साधा समारंभ

वकिल संघ किंवा हायकोर्टाचे विविध कार्यक्रम कायम भव्यदिव्य स्वरूपात सुरूची भोजनासह होत असतात. मात्र या कार्यक्रमाला साध्या पदधतीत करावा, सत्कार साधा करावा अशी घुगेे यांनी सूचना केली होती. यामुळे न्यायमुर्तीच्या या सुचनेचे तंतोतंत पालन करण्यात आले आणि केवळ पाणी चहा यावर खर्च करण्यात आला. आणि नियोजीत सर्व खर्च दुष्काळग्रस्तांना देण्याचे यावेळी ठरले आणि वकिल संघ यासाठी उत्स्फूर्त तयार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. न्यायमुर्ती घुगे यांनी मराठवाड्यातील दुष्काळाबाबत आपण ईपेपरवर कोलाकाता येथे वाचले आणि यामुळेच आपण हा सत्कार साध्या स्वरूपात घ्या असे सांगितले होते व त्याची अंमलबजवणी झाली याबददल वकिल संघाचे आभारही मानले.

Read About : Jio Platforms Stock Market Debut- जिओ प्लॅटफॉर्म्सची शेअर बाजारात जोरदार धडक
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.