Ad Advertisement Ad Advertisement

NASA Dragonfly Mission – शनीच्या चंद्रावर झळकू शकते तुमचेही नाव, NASA ची खास संधी

२०२८ मध्ये झेपावणार ‘ड्रॅगनफ्लाय’ यान; २०३४ मध्ये टायटनवर पोहोचण्याचे नियोजन, १५ जानेवारी २०२७ पर्यंत नोंदणीची संधी

वॉशिंग्टन : NASA Dragonfly Mission अंतराळप्रेमींसाठी नासाने एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे. शनीचा सर्वात मोठा चंद्र असलेल्या टायटनवर जाणाऱ्या ‘ड्रॅगनफ्लाय’ मोहिमेत नागरिकांना आपले नाव पाठवता येणार आहे. सहभागींची नावे एका मायक्रोचिपमध्ये साठवून ती यानासोबत अंतराळात नेली जाणार आहेत. नोंदणी करणाऱ्यांना वैयक्तिक डिजिटल बोर्डिंग पासही मिळणार आहे.
इच्छुकांनी नासाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आवश्यक माहिती भरून नाव नोंदवायचे आहे. ही संधी १५ जानेवारी २०२७ पर्यंत उपलब्ध आहे.

जॉन्स हॉपकिन्स उपयोजित भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत सध्या ड्रॅगनफ्लाय यानाची निर्मिती सुरू आहे. २०२८ मध्ये त्याचे प्रक्षेपण करण्याचे नियोजन असून, २०३४ मध्ये ते टायटनवर पोहोचेल. या मोहिमेचे नेतृत्व एलिझाबेथ टर्टल करत आहेत.NASA Dragonfly Mission

जीवसृष्टीच्या उगमाचा शोध

टायटनवर द्रवरूप मिथेनचे तलाव, नद्या, वाळूचे विस्तीर्ण ढिगारे आणि सेंद्रिय पदार्थ आहेत. ड्रॅगनफ्लाय विविध ठिकाणी उड्डाण करून जीवसृष्टी निर्माण होण्यापूर्वी घडलेल्या रासायनिक प्रक्रियांचा अभ्यास करणार आहे. या संशोधनातून जीवनासाठी आवश्यक घटक आणि परिस्थिती समजण्यास मदत होईल.

Read About : Three massive black holes – विश्वाच्या बालपणीची तीन कृष्णविवरे सापडली

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.