भोपाळच्या छोला मंदिर परिसरात घरात चौघांचे मृतदेह आढळले; नरेंद्र साहूचा रेल्वे रुळावर मृतदेह, घटनेमागील कारणांचा पोलिसांकडून तपास सुरू
भोपाळ – Suspected of Killing Four Family Members मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय तरुणाने आपल्या घरात आई, पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर त्याने रेल्वे ट्रॅकवर स्वतःचे जीवन संपवले. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.
भोपाळमधील छोला मंदिर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सुरुवातीला हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण असल्याचे मानले जात होते. मात्र, प्राथमिक तपासानंतर नरेंद्र साहू नावाच्या व्यक्तीने आधी आपल्या कुटुंबातील चार सदस्यांचा जीव घेतला आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घरात आढळले मृतदेह
भोपाळच्या गौर मॅरेज गार्डन परिसराजवळील एका निवासी इमारतीमध्ये कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आले. मृतांची ओळख नरेंद्रची आई सरस्वती साहू (५०), पत्नी सोमलता साहू (२९), मुलगी कृती साहू (१०) आणि मुलगा खुश साहू (६) अशी झाली आहे.
कुटुंबाच्या मृत्यूनंतर सुखिया सेवनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोप्रा कलां भागात रेल्वे ट्रॅकवर नरेंद्रचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही.
कारणाचा शोध सुरू
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. नरेंद्रने हे टोकाचे पाऊल का उचलले, तो कोणत्याही आर्थिक किंवा मानसिक तणावाखाली होता का, की काही कौटुंबिक वाद होता, या सर्व बाजूंचा पोलीस तपास करत आहेत.
Read About : Bomb Threat Email Maharashtra – महाराष्ट्रातील 8 हून अधिक जिल्हा व सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एकाच वेळी ई-मेल आल्याने खळबळ
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.