Ad Advertisement Ad Advertisement

Chikalthana illegal construction – 40 हजार चौ. फूटाचे बांधकाम होत असताना अतिक्रमण विभाग झोपला होता का?

सभापतींचा सवाल : आठ दिवसांत चौकशी अहवाल देण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : Chikalthana illegal construction जालना रोडवर, चिकलठाणा परिसरात ४० हजार चौ.फूटाचे विनापरवानगी अवाढव्य बांधकाम सुरू असताना अतिक्रमण हटाव विभाग झोपला होता का? या अनधिकृत बांधकामामुळे एका गरीब मजूराचा जीव गेला आहे, त्याचे कुंटुंब उघड्यावर आले आहे, मजूराच्या मृत्यूला जबाबदार कोण? असे प्रश्­न उपस्थित करत, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करून आठ दिवसात अहवाल देण्याचे तसेच दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश मंगळवारी (दि.३) झालेल्या सभेत दिले.

चिकलठाणा येथील अनधिकृत बांधकाम, तसेच स्लॅब कोसळून मजुराचा झालेल्या मृत्यूचा मुद्दा भाजप नगरसेवक रवी कावडे यांनी सभेत उपस्थित केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू होते, त्यास बांधकाम परवानगी होती का, अशी विचारणा त्यांनी केली. नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक दिपाली पाटील यांनी खुलासा देताना सांगितले की, २०१९ मध्ये एका खोलीसाठी ५५ चौ.मीटर बांधकामासाठी परवानगी देण्यात आली होती. पण मुदतीत बांधकाम न केल्याने, परवानगी कालबाह्य झाली. त्यावर सभापती मकरिये यांनी अतिक्रमण हटाव विभागाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. गरिबांची अतिक्रमणे काढण्यासाठी मोठा फौजफाटा घेऊन जातात, जालना रोडवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत नाही., अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. सभापती मकरिये यांनी आठ दिवसात चौकशी करून दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे, असे आदेश दिले.

नगररचना विभागाने आम्हांला कोणतीही माहिती दिली नाही : वाहुळे

अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतील विविध नियम त्यांनी सांगितले. अनधिकृत बांधकामांची तपासणी नगर रचना विभागामार्फत केली जाते. या तपासणीत बांधकाम विना परवानगी होत असल्यास, नोटिस पाठवून अधिकृत करून घेण्यासाठी सांगतात. दंड भरून नियमित करून देतात. मालमत्ताधारकांनी त्यांच्या नोटिसनंतर कार्यवाही केली नाही, तर पुढील कारवाईसाठी ते अतिक्रमण हटाव विभागाकडे प्रस्ताव पाठवितात. चिकलठाणा प्रकरणात अशी कोणतीही माहिती आम्हांला कळविण्यात आली नव्हती.

Read About : BJP AIMIM Face-Off Over Handcarts – ‘स्थायी’च्या सभेत हातगाड्या सोडण्यावरून भाजप-एमआयएम आमनेसामने
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.