एमजीएम विद्यापीठात पार पडला पारंपरिक केक मिक्सिंग सोहळा
छत्रपती संभाजीनगर : Christmas Traditional Cake Mixing Ceremony – सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्याचे माध्यम नसून विविध संस्कृती, परंपरा आणि माणसांना एकत्र आणणारा सामाजिक दुवा असतात. याच भावनेचा सुंदर प्रत्यय महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठात आयोजित पारंपरिक ‘केक मिक्सिंग’ सोहळ्यातून आला. ख्रिसमसच्या स्वागताची चाहूल देणाऱ्या या उपक्रमात विद्यापीठातील मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकता, सहकार्य आणि सांस्कृतिक समन्वयाचा संदेश दिला.
एमजीएम विद्यापीठाच्या इन्स्टट्यिूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पाककलेतील एका पारंपरिक प्रक्रियेची माहिती मिळाली नाही, तर एकत्रितपणे काम करण्याचा, परंपरांचा सन्मान करण्याचा आणि आनंद वाटून घेण्याचा अनुभवही मिळाला.
या समारंभास एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, डॉ. ए. बी. मराठे, अधिष्ठाता डॉ. प्राप्ती देशमुख, अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई, उपकुलसचिव प्रा. डॉ. परमिंदर कौर, संचालक डॉ. कपिलेश मंगल यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. एकूणच, केक मिक्सिंगच्या निमित्ताने एमजीएम विद्यापीठात पाककलेचा वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकतेचा गोड संगम अनुभवायला मिळाला. ख्रिसमसच्या स्वागतासोबतच माणसांना माणसांशी जोडणारा आनंदाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
Read About : Beed Teacher Recruitment – बीडमध्ये शिक्षक भरतीतील अनियमिततेवर मोठी कारवाई
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.