Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra Junior Softball Teams – 44 व्या ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ रवाना

४४व्या ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा भटिंडा (पंजाब) येथे

छत्रपती संभाजीनगर: Maharashtra Junior Softball Teams – ४४व्या ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा भटिंडा (पंजाब) येथे पार पडणार आहे. या राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र ज्युनिअर संघ, छत्रपती संभाजीनगर येथून रवाना झाला आहे. या पूर्वी संघाचे स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर हे छत्रपती संभाजीनगर येथे १९ ते २२ नोव्हेंबर २०२६ दरम्यान पार पडले.

महाराष्ट्र मुलांच्या संघात ओम घुगे, रवींद्र चोपकर, आयुष उदावंत, गौरव खैरे, आदित्य दहिवलीकर, आहान ननावरे, व्यंकट हरिजन, विश्वास परडके, अंकुश राजूरकर, ओम हातागळे, गौरव जगताप, अथर्व घुगे, अभिषेक जाधव, ओम बंडगर, सार्थक जाधव तर मुलींच्या संघात मनाली कुलकर्णी(कर्णधार), स्वरांजली देशपांडे, वैष्णवी कामिरे, अक्षदा भिसे, राजनंदिनी शिरगावे, माही सातपुते, यशश्री उके, शलाका महाजन, जागृती भानटे, अनुष्का कासार, लता जाधव, खुशी चौधरी, स्वप्नाली कावले, श्रावस्ती मानकर, साक्षी केदार, धीमही सावंत यांचा समावेश आहे. मुलांच्या संघाच्या प्रशिक्षकपदी सुमेध तळवेलकर, स्वप्नील गदादे, संतोष आवचार तर महाराष्ट्र मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी अक्षय येवले, भीमा मोरे, दीक्षा शिंनगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read About : Ugc Net December 2026 Exam – यूजीसी नेटचा बिगुल वाजला!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.