एकत्र राहतात, पण जेवतात आपापल्या आवडीचे
नवी दिल्ली : Food Divorce Trend – चांगल्या नात्यात जोडीदाराला छोट्या छोट्या गोष्टींतून प्रेम जाणवून देणे महत्त्वाचे असते. जोडीदाराच्या आवडीचे जेवण बनवणे हाही प्रेम दाखवण्याचा खास मार्ग आहे. जोडपे एकत्र स्वयंपाकघरात वेळ घालवते, नवी रेसिपी करून पाहते, तेव्हा एकमेकांच्या आवडी-निवडी आणि सवयी जवळून समजतात. पण कधी एकाला फिटनेस किंवा वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी किंवा जास्त प्रोटीनचा आहार हवा असतो, तर दुसऱ्याला आपल्या आवडीचे जेवण. अशा वेळी भांडणे वाढतात. मग जोडपे एकत्र राहते, पण जेवते वेगवेगळे. यालाच ‘फूड डिव्होर्स’ म्हणतात.
हा नात्यांतला एक वाढता ट्रेंड आहे. नाव ऐकून घटस्फोट असा अर्थ वाटेल, पण तसे अजिबात नाही. जेवणावरून रोज होणारे वाद टाळण्यासाठी काही जोडपी वेगवेगळे जेवण पसंत करतात. आज काय बनवायचे, कधी जेवायचे, कोणाच्या आवडीचे बनवायचे, यावरून अनेकदा वाद होतात. हे वाद वारंवार भांडणाचे कारण ठरू लागले, तेव्हा काहींनी सोपा मार्ग काढला. ते एकाच टेबलावर बसतात, पण प्रत्येक जण आपल्या आवडीचे जेवण जेवतो. यामुळे ताण कमी होतो आणि एकाला वारंवार आपल्या आवडीशी तडजोड करावी लागत नाही.
नेहमी एकटे जेवायचे असे नाही
फूड डिव्होर्स म्हणजे एकत्र जेवणे पूर्णपणे बंद करणे किंवा नेहमी एकटे जेवणे नव्हे. जोडपे हवे तेव्हा एकत्र स्वयंपाक करू शकते, बाहेर डिनरला जाऊ शकते किंवा एखाद्या खास प्रसंगी एकाच टेबलावर जेवू शकते. नात्यात आनंदी राहणे म्हणजे सगळे काही एकत्रच करणे असे नाही. स्वत:साठी थोडे स्वातंत्र्य आणि जोडीदाराच्या आवडीला जागा देणे, हेही आवश्यक असते.
हा ट्रेंड का वाढतोय?
एकत्र जेवताना काय बनवायचे, काय खायचे, काय मागवायचे, असे निर्णय घ्यावे लागतात. दोघांचे निर्णय जुळले नाहीत की भांडणे वाढतात. त्यावर फूड डिव्होर्स हा चांगला उपाय मानला जातो. जोडीदारावर आपली आवड लादावी लागत नाही. दोघे वेगवेगळे जेवण जेवू शकतात आणि भांडणेही कमी होतात. म्हणूनच जोडप्यांमध्ये हा ट्रेंड वेगाने वाढत आहे.
Read About : Malena and Klepetan Story : मालेनानंतर क्लेपेटानला मिळाली ‘स्नायका’ची साथ; स्टजेपन व्होकिच यांची माणुसकीची कहाणी पुन्हा चर्चेत, 2026
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.