Ad Advertisement Ad Advertisement

AI DNA Analysis – एआयद्वारे डीएनएचे थेट विश्लेषण; हगिंग फेसचे कार्बन एक्स मॉडेल लॉन्च

संशोधकांना आता स्थानिक संगणकावर डीएनए सीक्वेन्सचे विश्लेषण करता येणार

न्यूयॉर्क : AI DNA Analysis आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाला नवा आयाम देणारी एक मोठी घडामोडी घडली आहे. एआय क्षेत्रातील आघाडीचा प्लॅटफॉर्म हगिंग फेस ने कार्बन एक्स नावाचे एक अत्यंत प्रगत आणि ओपन-सोर्स एआय मॉडेल लाँच केले आहे. या मॉडेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संशोधक किंवा वापरकर्ते थेट आपल्या लॅपटॉप किंवा स्थानिक संगणकावरच सुरक्षितपणे डीएनए सीक्वेन्सचे विश्लेषण करू शकतील. हे मॉडेल चीनमधील झोंगगुआनकुन अकादमी आणि इटलीतील युनिव्हर्सिटी ऑफ नेपल्स फेडेरिको यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे.

डीएनए सोबत चॅट करण्याची सुविधा

कार्बन एक्स हे एखाद्या सामान्य चॅटबॉटप्रमाणे (उदा. चॅटजीपीटी ) काम करते. युजर्सना फक्त डीएनए सीक्वेन्सची टेक्स्ट फाईल कॉपी-पेस्ट करून साध्या इंग्रजी भाषेत प्रश्न विचारावे लागतील. हे मॉडेल जनुकीय रचनेतील बदल किंवा म्यूटेशन मानवी शरीरासाठी घातक आहे की निरुपद्रवी, याचा अचूक अंदाज लावते. एखादा जनुकीय बदल आजाराला कारणीभूत का ठरू शकतो, याचे शास्त्रोक्त विश्लेषण देते. दिलेल्या डेटाच्या आधारे पुढील डीएनए बेस तयार करते.

स्थानिक लॅपटॉपवर चालवण्याचे फायदे आणि सुरक्षितता

हे १४.८ अब्ज पॅरामीटर्सचे लहान मॉडेल आहे, जे संशोधकांच्या स्वत:च्या हार्डवेअरवर चालू शकते. बऱ्याचदा रुग्णांचा डीएनए डेटा आणि संशोधन अतिशय संवेदनशील असते. हे मॉडेल लॅपटॉपवरच चालत असल्याने कोणताही डेटा बाहेरील सर्व्हर किंवा कंपन्यांना पाठवण्याची गरज पडत नाही. इतर मोठ्या क्लाउड-बेस्ड एआय मॉडेल्सच्या (उदा. जीपीटी-६.१ एसओएल) तुलनेत कार्बन एक्सद्वारे डेटाचे विश्लेषण करण्याचा खर्च सुमारे १,८०० पटीने कमी येतो.

काही मर्यादा

शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, हे मॉडेल प्रयोगशाळेतील उपकरणांची जागा घेऊ शकत नाही, म्हणजेच हे प्रत्यक्ष डीएनए सीक्वेन्सिंग करत नाही. तसेच, यामध्ये काही वेळा चुकीची माहिती तयार होणे किंवा मोठ्या सीक्वेन्सच्या मोजणीत त्रुटी येण्याची शक्यता असते. म्हणूनच हे सध्या केवळ संशोधनासाठी उपलब्ध असून, याला अजून क्लिनिकल मान्यता मिळालेली नाही.

Read About: Bio-Hybrid Robots – उंदराच्या पेशींपासून बनवले उड्या मारणारे बायो-हायब्रिड रोबोट्स; शास्त्रज्ञांचा अनोखा शोध

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.