भाजपकडून शहरात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान विविध उपक्रम
छत्रपती संभाजीनगर : Birsa Munda Jayanti थोर स्वातंत्र्यसेनानी आणि आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत ‘जनजातीय गौरव दिन सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिन म्हणून घोषित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आ. प्रशांत बंब, आ, सुहास शिरसाट, शहराध्यक्ष शहराध्यक्ष किशोर शितोळे, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हाध्यक्ष सुरेेश बनकर, कार्यालय मंत्री धनंजय कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले, गंगापूर, लासूर स्टेशन परिसरात आदिवासी आणि विविध जनजातीतील युवकांसाठी उद्योग मेळावा आणि कर्ज वितरण मेळावा घेण्यात येईल. याशिवाय मतदारासंघात सहा दिवस मी स्वत: विविध भागात जाऊन तेथेच निवासी उपक्रम राबविणार आहे. आमदार सुहास शिरसाट यांनीही सिल्लोड, फुलंब्री परिसरात या कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले. संजय खंबायते यांनीही कन्नड परिसरात यासंबंधी कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले. किशोर शितोळे म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांचे साहस, त्याग आणि आदिवासी अस्मितेचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे.
सप्ताहातील प्रमुख कार्यक्रम
१४ नोव्हेंबर रोजी मंडल स्तरावर आदिवासी स्वातंत्र्य सेनानींच्या स्मारकांची व पुतळ्यांची स्वच्छता करून सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मंडल स्तरावर तसेच आदिवासीबहुल भागांत अभिवादन करण्यात येईल. आदिवासी लोककला, लोकनृत्य, लोकगीते आणि पारंपरिक ज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी जनजातीय स्वाभिमान संमेलने, शोभायात्रा, सांस्कृतिक मेळावे आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित चित्रकला, रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धाही होणार आहेत. या सप्ताहादरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या जनजाती कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.
Read About : Mim Corporator Suspension CSN – सभागृहात गैरवर्तवणूक ; एमआयएम नगरसेवकांचे निलंबन
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.