Ad Advertisement Ad Advertisement

Devgiri Bank National Award – देवगिरी बँकेला ग्राहकसेवेचा राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्लीत ‘एक्सलन्स इन कस्टमर सर्व्हिस’ पुरस्काराने गौरव; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल

छत्रपती संभाजीनगर : Devgiri Bank National Award ग्राहकांचा विश्वास, दर्जेदार सेवा आणि आधुनिक बँकिंग सुविधांच्या जोरावर देवगिरी नागरी सहकारी बँकेने राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान मिळवला आहे. बँकेला ‘एक्सलन्स इन कस्टमर सर्व्हिस’ हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवी दिल्ली येथे १९ नोव्हेंबर रोजी आयोजित ‘इंडियन को-ऑपरेटिव्ह समिट अँड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ या सोहळ्यात भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीजचे अध्यक्ष लक्ष्मी दास आणि सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष गौतम ठाकूर उपस्थित होते.

बँकेच्या वतीने संचालक राजेश जैन, ॲड. सागर विद्वंस आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारला. बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त केले. ग्राहकांचा विश्वास, कर्मचाऱ्यांचे समर्पित योगदान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार ही बँकेच्या यशाची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. हा पुरस्कार म्हणजे बँकेच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल असून भविष्यात अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी तो प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read About: Sleep and Brain Health : मधुमेह, हृदयरुग्णांसाठी चांगली झोप ठरते मेंदूची ढाल; 4 लाखांहून अधिक लोकांच्या अभ्यासातून निष्कर्ष

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.