Ad Advertisement Ad Advertisement

Diwali Cyber Fraud – दिवाळीत ₹ 2,000 मिळवण्याच्या आमिषाला बळी पडू नका! WhatsApp Scam पासून सावध

Diwali Cyber Fraud ‘मला २ हजार मिळाले, तू पण ट्राय कर!’ दिवाळीच्या नावाखाली सायबर चोरांचा नवा डाव!

Diwali Cyber Fraud ‘मला २ हजार रुपये मिळाले… आता तू पण ट्राय कर!’ असा मेसेज तुमच्या व्हॉट्सॲपवर आला आहे का? असेल तर सावधान! कारण दिवाळीच्या नावाखाली सायबर चोरटे तुमची फसवणूक करण्याच्या तयारीत आहेत.

दिवाळीची खरेदी, आकर्षक सवलती आणि मोफत पैशांचे आमिष… सणासुदीच्या काळात अशा ऑफर्स पाहून अनेकजण सहज आकर्षित होतात. मात्र, याच संधीचा फायदा घेत सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲपवर दोन हजार रुपयांचे दिवाळी गिफ्ट, सरकारी बोनस किंवा मोफत शॉपिंग व्हाउचर मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट लिंक पाठवत आहेत.

या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बनावट वेबसाइटवर वैयक्तिक माहिती भरण्यास, ओटीपी सांगण्यास किंवा संशयास्पद ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाऊ शकते. आणि एकदा तुम्ही या जाळ्यात अडकलात, तर तुमच्या बँक खात्यातील पैसे गायब होण्याची शक्यता आहे.

मग फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

  • अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
  • ओटीपी किंवा यूपीआय पिन कोणालाही सांगू नका.
  • मोफत पैसे मिळवण्यासाठी कोणतेही शुल्क भरू नका.
  • ऑफर खरी आहे की नाही, हे संबंधित कंपनीच्या किंवा सरकारी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासा.
  • संशयास्पद ॲप डाउनलोड करणे टाळा.

आणि चुकून आर्थिक फसवणूक झालीच, तर वेळ न घालवता तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

लक्षात ठेवा, दोन हजार रुपयांच्या आमिषापायी तुमच्या मेहनतीची कमाई गमावू नका!

सावध राहा, सुरक्षित राहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा!

Cyber fraud in Chhatrapati Sambhajinagar – सायबर भामट्यांचा डल्ला! मोबाईल हॅक करून ज्येष्ठाचे ७.३० लाख लंपास
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.