Ad Advertisement Ad Advertisement

Drainage Water Used for Farming Sambhajinagar – भाजीपाला पिकवण्यासाठी चक्क ड्रेनेजच्या पाण्याचा वापर

सुखना नदीतील भूमिगत गटार योजनेच्या चेंबरमधून पाणीचोरी : मनपाच्या पथकाला आढळला धक्कादायक प्रकार

drainage water used for farming Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : भाजीपाला पिकवण्यासाठी, शेतीसाठी चक्क ड्रेनेजलाइनमधून पाण्याचा उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार चिकलठाणा परिसरात घडला आहे. सुखना नदीतून गेलेल्या भूमिगत गटार योजनेच्या चेंबरमध्ये मोठमोठे पाइप टाकून मोटारीने सांडपाणी उचलले जात असल्याचे बुधवारी (दि.२१) सायंकाळी मनपाच्या पथकाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. पथकाने मोटारी, पाइप, स्टार्टर आदी साहित्य जप्त केले.

महापालिकेने भूमिगत गटार योजनेअंतर्गत शहरातील ड्रेनेजचे पाणी पाइपलाइनद्वारे एसटीपी प्लांटपर्यंत नेलेले आहे. या योजनेअंतर्गत चिकलठाणा, नारेगाव, सिडको, हडको आदी भागातील सांडपाणी झाल्टा येथील एसटीपी प्लांटपर्यंत पोहोचवण्यात येते. झाल्टा फाटा येथे ३५ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प सुरू केलेला आहे. झाल्टा येथील प्रकल्पाला पूर्वी १० एमएलडीपर्यंत ड्रेनेजचे पाणी येत होते. मात्र आता केवळ ५-६ एमएलडी पाणी येत असल्याचे मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी सोमवारी (दि.१९) केलेल्या पाहणीत अधिकाऱ्यांनी सांगितले.

सांडपाणी चोरीचा हा प्रकार दिसून आला

सुखना नदीच्या उगमापासून ते चिकलठाणा विमानतळाच्या भिंतीपर्यंत असे सुमारे साडेसात किलोमीटरचे नदीपात्र असून, या नदीपात्राचे सर्वेक्षण करा. नदीपात्रातील ड्रेनेजलाइनमधून पाणी चोरी होत आहे का, हे तपासा, असे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर वॉर्ड अभियंता, नागरी मित्र पथक आणि मनपा कर्मचाऱ्यांनी बुधवारी नदीपात्रात सर्वेक्षण केले असता, सांडपाणी चोरीचा हा प्रकार दिसून आला. एका चेंबरमध्ये ७-१० मोठमोठे पाइप टाकून, मोटारीने त्यातील पाणी उपसा केले जात होते. परिसरातील शेतीसाठी हे पाणी उपसा केले जात असल्याचे पाहून मनपा अधिकारी, कर्मचारही शॉक झाले.

मनपाच्या पथकाने

रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्याने भाजीपाला धुणाऱ्या विक्रेत्यांचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. एका केळी विक्रेत्याने सांडपाण्याने केळी झाकण्यासाठी वापरलेले गोणपाट भिजवल्याचाही व्हिडिओही ऑक्टोबर २०२४ मध्ये समोर आला होता. तत्कालीन आयुक्त जी. श्रीकांत यांनी या विक्रेत्यावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर मनपाच्या पथकाने त्याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Read About: Type 1 Diabetes Clinic – मधुमेहग्रस्त बालकांसाठी घाटीत राज्यातील पहिले विशेष क्लिनिक

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.