Ad Advertisement Ad Advertisement

Hamal Andolan 50 Kg Weight Limit – ५० किलो वजनाच्या अंमलबजावणीसाठी १ नोव्हेंबरला हमालांचे राज्यभर निदर्शने

मागणी मान्य न झाल्यास बाजारपेठा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : Hamal Andolan 50 Kg Weight Limit – राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ५० किलो वजनाच्या मर्यादेची काटेकोर अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी १ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील हमाल व कष्टकरी बाजार समित्यांसमोर निदर्शने करणार आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे यांनी माहिती दिली.

बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा अधिक वजनाची पोती उचलावी लागत असल्याने हमालांना पाठीचे आणि मणक्याचे विकार जडत आहेत. अनेकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत असून, त्यामुळे रोजगारही गमवावा लागत आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महामंडळाच्या वतीने २९ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राज्यातील विविध बाजार समित्यांमधील हमालांच्या आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा करण्यात आली.

महामंडळाचे उपाध्यक्ष विकास मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सरचिटणीस सुभाष लोमटे, चिटणीस अप्पा खताळ, हनुमंत बहिरट, रमझान पठाण, शिवाजी शिंदे, पुणे बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीचे संचालक देविदास कीर्तिशाही, अली खान पठाण, खजिनदार हुसेन पठाण आदी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनेही कामगारांच्या आरोग्याचा विचार करून ५० किलोपेक्षा अधिक वजन उचलण्यास प्रतिबंध असावा, असा ठराव केला आहे. केंद्र सरकारच्या कामगार विभागासह महाराष्ट्राच्या पणन संचालकांनीही ५० किलो वजनाच्या मर्यादेबाबत वेळोवेळी परिपत्रके काढली आहेत. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली.

बाजार समित्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये ५० किलो वजनाच्या मर्यादेबाबत जनजागृती करावी, अशी मागणीही करण्यात आली. १ नोव्हेंबर रोजी प्रत्येक बाजार समितीसमोर निदर्शने करून मागण्यांचे निवेदन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, माथाडी मंडळ, पणन संचालक तसेच पणन व कामगार मंर्त्यांना पाठविण्यात येणार आहेत.

Read About : Raj Thackeray Modi Adani documentary deleted- राज ठाकरेंकडून मोदी-अदाणींवरील डॉक्युमेंट्री डिलीट – 2026

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.