Ad Advertisement Ad Advertisement

maratha mawala sanghatana farmers protest drought – शेतकऱ्यांच्या हितासाठी मराठा मावळा संघटना मैदानात

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संघटनेचे कार्यक्रम रद्द; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा निर्धार

छत्रपती संभाजीनगर maratha mawala sanghatana farmers protest drought: दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे, शेतकऱ्यांना मदत करणे, हाच एकमेव अजेंडा राबविण्याचा, तसेच संघटनेचे यापुढील काळातील अनावश्यक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय मराठा मावळा संघटनेने घेतला आहे. शेतकऱ्यांची अडवणूक, अन्याय, पिळवणूक करणाऱ्यांविरोधात आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संघटना बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा निर्धारही बैठकीत करण्यात आला.

सिडकोतील बजरंग चौक येथील संघटनेच्या कार्यालयात रविवारी (दि.१) संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव कदम, मराठवाडा कार्याध्यक्ष दीपक झिमण पाटील, संग्रामसिंग जगताप, प्रभाकर मस्के पाटील, संदीप काळे पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता पाटील, अनिल तायडे पाटील, शानित चौधरी, जगन्नाथ तांगडे पाटील, समाधान चव्हाण, अभिषेक काकडे, भूषण चव्हाण, विद्या मोहिते, जमुना धनतोले, सुरज सपकाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.


शिंदे पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी लोकशाही मार्गांचा अवलंब करून शेतकऱ्यांसाठी लढा देण्याचे बैठकीत ठरविण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी प्रस्तावित असलेले वसतिगृहाचे रखडलेले काम सुरू करण्यासाठी आगामी काळात व्यापक आंदोलन उभारण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

गरीब व गरजू शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार मिळावा, या उद्देशाने वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read About : Maharashtra farmers foreign study tour amid drought – दुष्काळ असतानाही कृषी खात्याचा शेतकऱ्यांसाठी परदेश दौरा

E-Paper: Punyanagari E-Paper



Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.