Ad Advertisement Ad Advertisement

Marathwada 33 Lakh Farmers Receive 1678 Crore Diwali Advance Aid – मराठवाड्यातील ३३ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १६७८ कोटींची मदत जमा

बीड जिल्हा मदत वितरणात आघाडीवर, ६,१२,०९३ शेतकऱ्यांना ३०६.०५ कोटीचे अग्रीम वाटप

छत्रपती संभाजीनगर : Marathwada 33 Lakh Farmers Receive 1678 Crore Diwali Advance Aid मराठवाड्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने राज्य शासनाने संपूर्ण विभागात दुष्काळ जाहीर केला आहे. खरीप पिकांचे पंचनामे पूर्ण झाले तरी अद्याप केंद्राकडून मदत आलेली नाही. मात्र, शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी ५ हजार रुपये दिवाळी अग्रीम वितरिकत करण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारपर्यंत मराठवाड्यातील ३३ लाख ५६ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १६७८ कोटी २७ लाख ८५ हजार रुपयांचे वितरीत करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी दिली.

यावर्षी मराठवाड्यात अत्याल्प झाला. तब्बल ३५ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. कमी पावसामुळे मराठवाड्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली, तर काही ठिकाणी उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले. महसूल आणि कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केले. परंतु अद्याप केंद्राकडून मदत मिळालेली नाही. खरीप हंगामातील नुकसान आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार दिवाळीपूर्वीपासून विभागातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये मदत जमा करण्यास सुरुवात झाली होती. सोमवारी (दि.९) सायंकाळपर्यंत तब्बल ३३ लाख ५६ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १६७८ कोटी २७ लाख ८५ हजार रुपये जमा झाले आहेत.
जिल्हानिहाय आकडेवारी पाहता बीड जिल्हा मदत वितरणात आघाडीवर असून येथील ६,१२,०९३ शेतकऱ्यांना ३०६.०५ कोटी रुपयांचे अग्रीम वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, तसेच रब्बी हंगामाच्या तयारीसाठी काही प्रमाणात हातभार लागावा, या उद्देशाने ही अग्रीम मदत देण्यात शासनाकडून वितरीत करण्यात आली आहे. आता शासनाकडून जाहीर होणाऱ्या मदतीकडेच शेकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्हानिहाय दिवाळी अग्रीम वितरण


जिल्हा लाभार्थी शेतकरी वितरित रक्कम (कोटी)
छत्रपती संभाजीनगर ४,६९,५७९ २३४.७८
बीड ६,१२,०९३ ३०६.०५
नांदेड ५,६२,८६८ २८१.४३
जालना ४,३८,८४४ २१९.४२
लातूर ३,८१,९६१ १९०.९८
धाराशिव ३,४७,०७२ १७३.५४
परभणी ३,३६,३८० १६८.१९
हिंगोली २,१२,७६० १०६.३८
एकूण ३३,३६,३६० १,६६८.१८

Read About : Diwali Electrical Firecracker Safety – रोषणाईचा उत्साह, पण सुरक्षेचा विसर नको!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.