ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ओपनएआयचाही संभाव्य यादीत समावेश; अमेरिकी एआय तंत्रज्ञानाचा जागतिक विस्तार आणि चिनी कंपन्यांशी स्पर्धा वाढवण्याचा प्रयत्न
वॉशिंग्टन डीसी : NVIDIA AI National Champion चीनसोबतच्या वाढत्या सामरिक आणि तंत्रज्ञान स्पर्धेत अमेरिकी कंपन्यांना जागतिक बाजारात आगेकूच करता यावी यासाठी ट्रम्प प्रशासन एक महत्त्वाची मोहीम राबवत आहे. या अंतर्गत वादात सापडलेल्या एनव्हीडियासह ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ओपनएआय आणि अँथ्रोपिक आदी २४ हून अधिक अग्रगण्य अमेरिकी कंपन्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील ‘नॅशनल चॅम्पियन’ म्हणून घोषित करण्याची तयारी सुरू आहे. वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटझनिक यांच्यामार्फत आगामी आठवड्यात यादीची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. परदेशी सरकारे आणि व्यावसायिक संस्थांनी चिनी पर्यायाऐवजी अमेरिकेत विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींचा स्वीकार करावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
कोणाला काय फायदा?
- या चौकटीत अमेरिकी प्रोसेसर, एआय आर्किटेक्चर आणि संबंधित उत्पादने सुलभ पॅकेजिंगमध्ये एकत्र आणली जातील, जेणेकरून परदेशी खरेदीदारांना खरेदी करणे सोपे जाईल.
- राष्ट्रीय चॅम्पियन म्हणून निवडलेल्या कंपन्यांना निर्यात परवान्यांसाठी वेगवान मंजुरी, आंतरराष्ट्रीय कामकाजात अधिकृत सरकारी साहाय्य आणि फेडरल निधी यंत्रणांचा लाभ मिळण्यास पात्रता प्राप्त होईल.
- जागतिक विस्तार : हुआवेसारख्या चिनी कंपन्या युरोप आणि लॅटिन अमेरिका सारख्या बाजारपेठांमध्ये आक्रमकपणे विस्तार करत आहेत, त्यांना रोखण्यासाठी अमेरिका आपली तांत्रिक पाळेमुळे जागतिक स्तरावर मजबूत करत आहे.
एनव्हीडियाचे स्थान महत्त्वाचे
एनव्हीडियाचे हार्डवेअर जागतिक स्तरावरील सर्वात प्रगत एआय प्रणालींना उर्जा पुरवत असल्याने या धोरणात कंपनीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे निकष आणि निर्यातीवरील कडक नियंत्रणांच्या मुद्द्यांदरम्यान हा निर्णय घेतला जात असून, जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिकेचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Read About : AI Billionaires Bunkers : एआयच्या विनाशाची भीती की सुरक्षिततेची तयारी? टेक अब्जाधीश उभारताहेत भूमिगत बंकर्स!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.