Ad Advertisement Ad Advertisement

Organoids and AI Alternative to Animal Testing : प्राण्यांवरील प्रयोगांना पर्याय ठरताहेत ऑर्गनॉइड्स आणि एआय तंत्रज्ञान

प्रयोगशाळेतील प्राण्यांवरील प्रयोगांना आता मानवी पेशींपासून बनलेले ऑर्गनॉइड्स आणि एआय ठरताहेत सक्षम पर्याय

वॉशिंग्टन : Organoids and AI Alternative to Animal Testing वैद्यकीय संशोधन आणि नवीन औषधांच्या चाचणी प्रक्रियेत मोठे स्थित्यंतर घडून येत आहे. प्रयोगशाळेत उंदीर, ससे किंवा इतर प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रयोगांऐवजी आता मानवी मूळ पेशींपासून तयार केलेले सूक्ष्म अवयव म्हणजेच ऑर्गनॉइड्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

ऑर्गनॉइड्स हे मानवी मेंदू, यकृत, हृदय, मूत्रपिंड किंवा आतड्यांसारख्या खऱ्या अवयवांची हुबेहूब नक्कल करणारे त्रिमितीय सूक्ष्म नमुने असतात. प्राण्यांची शारीरिक रचना माणसापेक्षा वेगळी असल्याने प्राण्यांवर यशस्वी ठरलेली अनेक औषधे मानवी चाचण्यांमध्ये अपयशी ठरत होती. मात्र, मानवी पेशींपासून बनवलेल्या या सूक्ष्म अवयवांमुळे औषधांचा मानवी शरीरावर होणारा नेमका परिणाम आणि संभाव्य दुष्परिणाम अधिक अचूकपणे तपासणे शक्य झाले आहे. यासोबतच प्रगत एआय मॉडेल्सच्या मदतीने औषधांची सुरक्षितता आणि विषारीपणाचा अंदाज काही मिनिटांत लावला जात आहे.

जागतिक स्तरावर या तंत्रज्ञानाला मोठे पाठबळ मिळत आहे. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ हेल्थ आणि फुड ॲण्ड ड्रग्स ॲडनिस्ट्रेशन या संस्थांनी प्राण्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक करून मानवी-आधारित संशोधन पद्धतींना प्रोत्साहन दिले आहे. या बदलामुळे केवळ कोट्यवधी प्राण्यांचे प्राण वाचू शकतील.तसेच तर कर्करोग आणि मेंदूच्या दुर्धर आजारांवर वैयक्तिकृत औषधे शोधण्याचा वेग आणि अचूकताही कैक पटींनी वाढणार आहे.

Read About: Sleep and Brain Health : मधुमेह, हृदयरुग्णांसाठी चांगली झोप ठरते मेंदूची ढाल; 4 लाखांहून अधिक लोकांच्या अभ्यासातून निष्कर्ष

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.