विहिरी व बोअरवेल कोरड्या; टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठाही अपुरा, नागरिकांना दिलासा देण्याची आयुक्तांकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर :Satara Water Shortage सातारा गाव व परिसरातील पाणीटंचाई गंभीर बनली असून, नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी २४ हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर तातडीने सुरू करावेत, अशी मागणी महापौर अनिता नंदकुमार घोडेले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात १६ नोव्हेंबर रोजी आयुक्तांना निवेदन देण्यात आले. सातारा परिसरातील विहिरी आणि बोअरवेलमध्येही पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला, तरी तो अपुरा पडत आहे. पैसे भरून टँकर मागविणाऱ्या नागरिकांनाही वेळेवर पाणी मिळत नसल्याची परिस्थिती असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पाण्याचे टँकर मोफत उपलब्ध करून द्यावेत
सातारा गाव व परिसरातील नागरिक महापालिकेच्या विरोधात सातत्याने आंदोलने करीत असून, नगरसेविकांना घेराव घालण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे या भागातील पाणीप्रश्न सोडविण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असल्याचे महापौरांनी म्हटले आहे. सातारा गाव व परिसराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी २४ हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर तातडीने सुरू करावेत. तसेच उर्वरित सातारा परिसर, गुठेवाडी भाग आणि नो-नेटवर्क क्षेत्रातही पिण्याच्या पाण्याचे टँकर मोफत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Read About : India’s Biggest Petroleum Company – इंडियन ऑइल की रिलायन्स? जाणून घ्या भारतातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपन्यांचे साम्राज्य
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.