६ लाख ८ हजार ४१२ मतदारांची नावे वगळली, मतदार यादीत नाव नसलेल्यांना करावा लागणार नव्याने अर्ज
छत्रपती संभाजीनगर : Sir Voter List 6 Lakh Names Deleted – जिल्ह्यातील मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षणचे (एसआयआर) काम ९९.९७ टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात एसआयआरपूर्वी ३२ लाख १६ हजार १६७ मतदार होते. एसआयआरनंतर ६ लाख ८ हजार ४१२ मतदारांची नावे वगळण्यात आली असून २६ लाख ७ हजार ७५५ मतदारांची नावे यादीत अधिकृतरीत्या राहिली आहेत. या प्रक्रियेनंतर ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांना नव्याने नोंदणी अर्ज करावा लागणार आहे.
जिल्ह्यात ३० जूनपासून एसआयआरच्या प्रक्रियेला सुुरुवात झाली. या मोहिमेत ३ हजार २६४ बीएलओंनी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा केली. ३१ ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारुप मतदार यादीवर १३ नोव्हेंबरपर्यंत दावे हरकती नोंदविण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेनंतर आता जिल्ह्याच्या मतदार यादींत २६ लाख ७ हजार ७५५ मतदार शिल्लक राहिले आहेत. तर ६ लाख ८ हजार ४१२ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यामध्ये स्थलांतरित, मृत, दुबारनावे, गैरहजर, पत्ता अपूर्ण असलेल्या मतदारांचा समावेश आहे. नव्याने मतदार यादीत नाव येण्यासाठी नागरिकांना १२ पैकी एक किंवा दोन पुराव्यानिशी फॉर्म क्र. ६ भरून बीएलओंकडे सादर करावा लागेल. ९९.९७ टक्के मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम पूर्ण झाल्याचा दावा उपजिल्हाधिकारी सविता चौधर यांनी केला.
३० नोव्हेंबरला अंतीम मतदार यादी
१३ नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत होती. हरकती एआरओ स्तरावर असून त्यावर ते निर्णय घेणार आहेत. यामध्ये शहरातील मतदारसंघातील हरकती जास्त आहेत. ३० नोव्हेंबरला अंतीम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. ६ लाख ८ हजार ४१२ मतदारांची नावे वगळली आहेत. त्यात ज्यांनी अर्ज न भरणारे, मयत मतदारांच्या नावांचा समावेश आहे.
– सविता चौधर, निवडणूक उपजिल्हाधिकारी

Read About : Sugarcane Price 4200 Rupees – उसाला प्रतिटन 4,200 रुपये भाव द्या, अन्यथा सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.