Ad Advertisement Ad Advertisement

Vaijapur murder case 26 जणांविरुद्ध खुनासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा; अटकेसाठी पोलिसांची चार पथके रवाना

रोहित पठारे मृत्यूप्रकरणी नातेवाइकांचा आक्रोश : आरोपींच्या अटकेसाठी रास्ता रोको

Vaijapur murder case वैजापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीतील जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रोहित अनिल पठारे (रा. वैजापूर) यांचा मंगळवारी रात्री शिर्डी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर बुधवारी त्यांच्या नातेवाइकांनी आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी वैजापूर पोलीस ठाण्यात ठिय्या देत आक्रोश केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी अटकेचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

३१ ऑक्टोबर रोजी येवला रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये दोन गटांत कोयता, लोखंडी कत्ती, रॉड आणि फावड्याच्या दांड्याने मारहाण झाली होती. यात रोहित गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर वैजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर शिर्डी येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रोहित यांच्या नातेवाइकांनी आरोपींना अटक होईपर्यंत शवविच्छेदन करू देणार नसल्याची भूमिका घेत पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या दिला. दुपारी तीन वाजेपर्यंत समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. त्यानंतर आंदोलकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको केला.

मार्गावरील वाहतूक ठप्प, तणावामुळे व्यापाऱ्यांनी दुकानेही ठेवली बंद

यामुळे नाशिक-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तणावामुळे परिसरातील काही व्यापाऱ्यांनी दुकानेही बंद ठेवली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विनय सोनवणे, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, सहायक निरीक्षक संतोष मिसाळे व प्रदीप भिवसने यांच्यासह छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढली. आरोपींना लवकर अटक करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला आणि वाहतूक पूर्ववत झाली.

घरात घुसून कुटुंबीयांना मारहाण

रोहित यांच्या पत्नी शितल पठारे यांच्या फिर्यादीवरून २६ जणांविरुद्ध खून आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी घरात घुसून रोहित व कुटुंबीयांना मारहाण केल्याचा तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत.

Read About : Husband Suicide After Wife Affair – पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची सासरवाडीतच आत्महत्या
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.