नासाचा नवीन चित्रसंग्रह : कृष्णविवरांचे जेट्स आणि भीषण टक्करी कॅमेऱ्यात कैद!
वॉशिंग्टन : NASA 16 galaxies image collection – अवकाशाचे रहस्य उलगडण्याच्या दिशेने अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने एक मोठे पाऊल उचलले आहे. नासाने ह्यचंद्रा एक्स-रे वेधशाळा, जेम्स वेब, हबल आणि जगातील इतर नामांकित दुर्बिणींच्या माहितीच्या आधारे तब्बल १६ दीर्घिकांचा (गॅलेक्सींचा) नवीन चत्रिसंग्रह प्रसद्धि केला आहे. या संग्रहातील चत्रिांत विशाल कृष्णविवरांच्या केंद्रस्थानातून बाहेर पडणारे अतिशय वेगवान, उर्जावान आणि प्रचंड लांबीचे प्रकाशमय कण आणि ऊर्जातरंगांचे प्रवाह तसेच प्रचंड वेगाने होणारी ताऱ्यांची नर्मितिी आणि दीर्घिकांच्या भीषण टक्करी स्पष्टपणे दिसून येतात.
दीर्घिका म्हणजे अब्जावधी तारे, वायू, धूळ आणि सौरमालांचा मिळून बनलेला एक विशाल समूह. आपली सूर्यमाला ज्यामध्ये सामावलेली आहे, त्या दीर्घिकेला आपण आकाशगंगा नावाने ओळखतो. खगोलशास्त्रज्ञांनी दीर्घिकांचे सर्पिल, दीर्घवृत्ताकार आणि अनियमित दीर्घिका या तीन प्रकारांत वर्गीकरण केले आहे. सर्पिलच्या आपल्या आकाशगंगेप्रमाणे सुंदर वळणदार भुजा असतात. दीर्घवृत्ताकार या प्रकारच्या दीर्घिकांमध्ये प्रामुख्याने जुने तारे असतात. अनेकदा दोन दीर्घिका एकमेकींत विलीन झाल्यामुळे यांची नर्मितिी होते. अनियमित दीर्घिकांचा आकार ठराविक नसतो आणि यांच्यामध्ये अनेक तीव्र खगोलशास्त्रीय घटना घडत असतात.
एकाच चित्रात अनेक दुर्बिणींचे योगदान
या नव्या संग्रहातील प्रत्येक चत्रिामागे एकापेक्षा अधिक दुर्बिणींचे मोठे योगदान आहे. यात चंद्र वेधशाळेचा एक्स-रे डेटा प्रामुख्याने वापरला गेला आहे. त्यासोबतच जेम्स वेब, हबल, आयएक्सपीई, स्वफ्टि, न्यूस्टार आणि जमिनीवरील वेधशाळांची माहिती एकत्र करून ही चत्रिे तयार केली गेली आहेत. एक्स-रे प्रकाशामुळे सामान्य डोळ्यांना किंवा साध्या दुर्बिणींना न दिसणाऱ्या अतिशय उष्ण घटना अभ्यासता येतात. उदाहरणार्थ, लाखो अंश सेल्सिअस तापमानातील वायू, कृष्णविवरांतून बाहेर फेकले जाणारे पदार्थ आणि मृत ताऱ्यांचे स्फोट झालेले अवशेष शोधणे यामुळे सुलभ होते.
नवीन तारे कसे जन्मतात?
मेसियर ३३ आणि एनजीसी ३९३८ या सर्पिल दीर्घिका वरून पाहल्यिासारख्या दिसतात, त्यामुळे त्यांच्या सुंदर भुजा आणि ताऱ्यांच्या स्फोटांचे अवशेष अत्यंत स्पष्टपणे दिसतात. एनजीसी १६७२ आणि एनजीसी १३८५ या ह्यबार स्पायरलह्ण दीर्घिका आहेत. यांच्या मध्यभागी तारे, वायू आणि धूळीची लांबट रचना असते, जी गॅसचा ओघ आतील भागाकडे नेण्याचे काम करते. यामुळे या भागात नवीन तारे तयार होण्याची प्रक्रिया अतिशय वेगाने होते. ह्यव्हेल गॅलेक्सीह्ण (एनजीसी ४६३१) आणि ह्यसिगार गॅलेक्सीह्ण (मेसियर ८२) या दीर्घिकांमध्ये लाखो अंश तापमानाचा गरम वायू वाहणारे प्रचंड वारे आढळले आहेत. हे वारे हजारो प्रकाशवर्षांपर्यंत पदार्थ वाहून नेतात, ज्यामुळे संपूर्ण वश्विात महत्त्वाची रासायनिक द्रव्ये पसरण्यास मदत होते.
कृष्णविवरांची अफाट शक्ती
काही दीर्घिकांच्या अगदी मध्यभागी असणारी कृष्णविवरे आजूबाजूचे सर्व पदार्थ गिळंकृत करत असतात. जेव्हा असे घडते, तेव्हा त्यांचा मध्यभाग अत्यंत तेजस्वी बनतो आणि उच्च ऊर्जेचे कण शक्तिशाली जेटच्या स्वरूपात बाहेर फेकले जातात. अशा सक्रिय दीर्घिका-केंद्रांना सक्रीय गॅलॅक्टिक न्युक्लियस म्हटले जाते.
दीर्घिकांची टक्कर आणि आपल्या आकाशगंगेचे भवितव्य
अवकाशातील दीर्घिका नेहमी शांत बसत नाहीत. गुरुत्वाकर्षणामुळे काही वेळा दोन दीर्घिका एकमेकांच्या जवळ येतात, त्यांच्यात भीषण टक्कर होते किंवा त्या एकमेकांत पूर्णपणे विलीन होतात. अशा घटनांमुळे त्यांचा आकार पूर्णपणे बदलतो आणि नव्या ताऱ्यांच्या नर्मितिीचा मोठा मार्ग खुला होतो. आर्प १४३ या चत्रिामध्ये एका दीर्घिकेची दुसऱ्या दीर्घिकेची थेट टक्कर झाल्याचे पाहायला मिळते. पाण्यात दगड मारल्यावर जशा लांब वलयाकृती पसरतात, तसेच वलय येथे तयार झाले असून त्याच्या लाटांमुळे नवीन ताऱ्यांचा जन्म झाला आहे. अशा प्रकारच्या टक्करी आपल्या आकाशगंगेच्या भवष्यिाची अचूक झलक दाखवतात, कारण आजपासून अब्जावधी वर्षांनंतर आपली आकाशगंगा आणि शेजारची अँड्रोमिडा दीर्घिका एकमेकांत विलीन होणार आहेत.
तीन दीर्घिकांची वैशिष्ठ्ये
सेंटॉरस ए : या दीर्घिकेच्या मधून हजारो प्रकाशवर्षांपर्यंत लांब पसरलेला उच्च-ऊर्जा कणांचा जेट निघाल्याचे यात दिसते.
मेसियर १०६ : येथील कृष्णविवराचे जेट आजूबाजूचा वायू प्रचंड गरम करतात, ज्यामुळे तिथे एक असामान्य सर्पिल रचना तयार होते.
सोम्ब्रेरो दीर्घिका : हिच्या मध्यभागी विशाल कृष्णविवर असून, चंद्र दुर्बिणीने तिच्याभोवती लाखो अंश उष्ण वायूचे आवरण शोधून काढले आहे.
Read About : Black Hole 2 Percent Rule : कृष्णविवरांबाबत २ टक्क्यांचा वैश्विक नियम; शक्तिशाली स्फोटांचा अंदाज लावणे शक्य होणार?https://epunyanagari.com/black-hole-2-percent-rule/
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.