Ad Advertisement Ad Advertisement

Sugary Drinks Cancer Risk – रोज गोड पेये पिणाऱ्यांना पोटाच्या कर्करोगाचा 2.45 पट अधिक धोका? संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

संशोधनात दररोज साखरयुक्त पेये पिणे आणि पोटाच्या कर्करोगाचा वाढलेला धोका यांच्यात संबंध आढळल्याचा दावा

बोस्टन (अमेरिका) : Sugary Drinks Cancer Risk दररोज सोडा, कोल्ड्रक्सिं किंवा गोड ज्यूस पिण्याची सवय असलेल्या लोकांसाठी एक अत्यंत चिंताजनक माहिती समोर आली आहे. एका ताज्या दीर्घकालीन अभ्यासानुसार, जे लोक दररोज किमान एक साखरयुक्त पेय पितात, त्यांना पोटाचा कर्करोग होण्याचा धोका सामान्य लोकांपेक्षा तब्बल २.४५ पटीने अधिक (दुप्पट) असतो.

संशोधनातील महत्त्वाचे तपशील

हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि मास जनरल ब्रिघम कॅन्सर इन्स्टट्यिूटच्या संशोधकांनी १,१२,२८४ प्रौढ व्यक्तींच्या आरोग्याचा आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा कित्येक दशकांहून अधिक काळ अभ्यास केला. या प्रदीर्घ कालावधीत २७८ जणांना पोटाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. संशोधनात नियमित कार्बनयुक्त कोल्ड्रक्सिं, फळांचे गोड ज्यूस, लिंबूपाणी आणि स्पोर्ट्स ड्रक्िंसचा समावेश करण्यात आला होता. जे लोक महिन्यातून एकदाच अशी पेये पितात, त्यांच्या तुलनेत दररोज पिणाऱ्यांना हा धोका सर्वाधिक आढळला. हा धोका महिला आणि पुरुष दोन्हीमध्ये दिसून आला. मात्र, पुरुषांच्या तुलनेत (दोन पट) महिलांमध्ये हा धोका तब्बल ३.०४ पटीने (तीन पट) जास्त असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. या पेयांमध्ये गोडव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फ्रुक्टोज या साखरेचे उच्च प्रमाण थेट पोटाच्या कर्करोगाच्या वाढीशी संबंधित असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

डाएट ड्रींक्स पूर्णपणे सुरक्षित

या अभ्यासात संशोधकांनी कृत्रिम साखर वापरलेल्या म्हणजेच डाएट किंवा लो-कॅलरी पेयांचाही अभ्यास केला. दिलासादायक बाब म्हणजे, ही कृत्रिम साखर असलेली पेये पिणाऱ्यांमध्ये पोटाच्या कर्करोगाचा कोणताही अतिरिक्त धोका आढळून आला नाही.

कारण की केवळ संबंध?

प्रमुख संशोधक डॉ. अँर्ड्यू टी. चॅन यांच्या मते, हे एक ऑब्झर्वेशनल म्हणजेच केवळ निरीक्षण केलेले संशोधन आहे. याचा अर्थ असा नाही की केवळ सोडा पिण्यामुळेच कॅन्सर होतो. साखरेमुळे वाढणारे वजन, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि शरीरातील अंतर्गत सूज यांसारखी इतर अनेक कारणेही या कर्करोगाच्या वाढीमागे असू शकतात.

Read About : Cancer-fighting stem cells : कर्करोगाविरुद्ध लढणाऱ्या बीज पेशींचा नवीन स्रोत शोधला 2026

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.