Ad Advertisement Ad Advertisement

Indian Railway News – रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत रेल्वेतील चार्जिंग पॉइंट्स बंद!

पॉवर बँकचा स्फोट झाल्याच्या घटनेनंतर रेल्वे बोर्डाचे कठोर निर्देश; सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कारवाईचे संकेत

नवी दिल्ली : Indian Railway News रेल्वे प्रवासादरम्यान आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रेल्वे डब्यांमधील मोबाईल चार्जिंग पॉइंट्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व विभागीय रेल्वेंना देण्यात आले आहेत.

रेल्वे बोर्डाने २६ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रात या निर्देशांचा उल्लेख केला आहे. दक्षिण पूर्व रेल्वेच्या हद्दीत रात्रीच्या वेळी चार्जिंग पॉइंट्स सुरू असल्याने एका प्रवाशाची पॉवर बँक चार्जिंगदरम्यान गरम होऊन त्यातून धूर निघाल्याची आणि ती फुटल्याची घटना घडली होती. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे बोर्डाने सुरक्षेच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

रात्री सहा तास चार्जिंग पॉइंट्स बंद

रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार, रात्री ११ ते पहाटे ५ या सहा तासांच्या कालावधीत डब्यांमधील चार्जिंग पॉइंट्स कोणत्याही परिस्थितीत सुरू ठेवू नयेत. या नियमाची माहिती संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना देऊन त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय, अधिकारी आणि पर्यवेक्षकांनी अचानक तपासणी करून चार्जिंग पॉइंट्स निर्धारित वेळेत बंद ठेवले जात आहेत की नाही, याची खात्री करावी, असेही निर्देशात नमूद करण्यात आले आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य

मोबाईल फोन, पॉवर बँक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करताना आग लागण्याचा किंवा अन्य दुर्घटना घडण्याचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने या नियमाच्या अंमलबजावणीत कोणतीही ढिलाई न करण्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे रात्रीच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना मोबाईल किंवा अन्य उपकरणे चार्ज करण्यासाठी डब्यांमधील चार्जिंग पॉइंट्सचा वापर करता येणार नाही. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या वेळेची नोंद घ्यावी.

Read About : Microfinance Debt Crisis in Hingoli- मायक्रो फायनान्सच्या वसुलीचा जाच; वाघजाळीत भूमिहीन मजुरांनी घरे काढली विक्रीला!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.