Ad Advertisement Ad Advertisement

Nanded Crime News – नांदेडमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; 3 महिलांची सुटका

सोनाई नगरमधील शिवसाई अपार्टमेंटमध्ये कारवाई; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : Nanded Crime News शहरातील अनैतिक मानवी व्यापाराला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने २९ ऑक्टोबर रोजी सोनाई नगर परिसरातील शिवसाई अपार्टमेंटमध्ये सुरू असल्याची माहिती मिळालेल्या कुंटणखान्यावर छापा टाकला. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोगस गिऱ्हाईकाच्या माध्यमातून कारवाई

शिवसाई अपार्टमेंटमध्ये पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. कारवाईपूर्वी माहितीची खातरजमा करण्यासाठी शासकीय पंचांच्या उपस्थितीत एका सामाजिक कार्यकर्त्याला बोगस गिऱ्हाईक म्हणून संबंधित ठिकाणी पाठविण्यात आले. ठरल्याप्रमाणे इशारा मिळताच पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या कारवाईदरम्यान पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

  1. रणजितकौर अजय तिवारी (वय ५०, रा. सोनाई नगर, नांदेड)
  2. धरमसिंग महीद्रसिंग अलग (वय ३१, रा. सोनाई नगर, नांदेड)
  3. दत्ता हरी उमरे (वय ४०, रा. विद्युत नगर, नांदेड)
  4. आशिष साहेबराव किर्तणे (वय २५, रा. सर्वोदय नगर, नांदेड)
  5. मनोज नामदेव सूर्यवंशी (वय २२, रा. चैतन्य नगर, नांदेड)
  6. महेश राजू वाघमारे (वय २५, रा. चिखलवाडी, नांदेड)
३४ हजारांचा मुद्देमाल जप्त

छाप्यादरम्यान तीन महिलांची सुटका करण्यात आली. घटनास्थळावरून वेश्यागमनासाठी वापरले जाणारे साहित्य, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण ३४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६२६/२०२६ नुसार अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ४, ५, ६ आणि ७ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४३ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

Read About : Mystery Case : ज्या मुलीला मृत समजून अंत्यसंस्कार केले, ती 3 वर्षांनी निघाली जिवंत; आईला व्हिडिओ कॉल
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.