Ad Advertisement Ad Advertisement

Nvidia AI Chip Smuggling – चीनसाठी एआय चिप तस्करीचा संशय; एनव्हिडियाचे प्रमुख चर्चेत

सिंगापूरस्थित कंपनीच्या अधिकारी महिलेवर हेरगिरीचाही आरोप

वॉशिंग्टन : Nvidia AI Chip Smuggling – प्रगत एआय चिप्स चोरट्या मार्गाने चीनला पाठवणाºया कथित जाळ्याचा तपास अमेरिका करत आहे. या रॅकेटने चीनसाठी हेरगिरी आणि गोपनीय व्यावसायिक माहिती गोळा केल्याचाही संशय असून, त्याचाही तपास केला जात आहे. या प्रकरणात एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग यांचे नाव चर्चेत आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अ‍ॅलिस हुआंग ही या तपासाच्या केंद्रस्थानी आहे. तिला हुआंग ले असेही म्हटले जाते. ती चिनी नागरिक असून सिंगापूरस्थित मेगास्पीड या डेटा सेंटर कंपनीत वरिष्ठ अधिकारी होती. २०२३ मध्ये कंपनी सुरू झाली तेव्हा ती फार थोड्या काळासाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होती; नंतर तिचे नाव त्या पदावरून काढण्यात आले. मेगास्पीड ही एनव्हिडियाच्या चिप्सवर चालणारी संगणक यंत्रणा खरेदी करते व मध्यस्थ म्हणून काम करते. ती चीनच्या अलिबाबासह विविध कंपन्यांना डेटा सेंटरची क्षमता भाड्याने देते. जेन्सन हुआंग आणि अ‍ॅलिस हुआंग यांचा एकमेकांशी नात्याचा संबंध नाही; आडनाव योगायोगाने सारखे आहे.
अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत प्रगत एआय चिप्स चीनला निर्यात करण्यावर निर्बंध घातले आहेत. मेगास्पीड हे निर्बंध टाळून चिनी कंपन्यांना तंत्रज्ञान मिळवून देण्यास मदत करत असल्याचा संशय अमेरिकी अधिकाºयांना आहे. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, २०२४ च्या उत्तरार्धात या कंपनीकडे संशयाने पाहिले जाऊ लागले. मलेशियातील तिच्या एका डेटा सेंटरला भेट दिलेल्या अमेरिकी वाणिज्य विभागाच्या अधिकाºयाला तिथे एनव्हिडियाची यंत्रणा खोक्यांतच पडलेली आढळली. ती तिथे बसवली जात होती की दुसरीकडे पाठवली जाणार होती, असा प्रश्न त्यातून निर्माण झाला.
मेगास्पीडच्या मलेशियातील भगिनी कंपनीने जून २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या काळात एनव्हिडियाच्या चिप्स आणि तंत्रज्ञान असलेली किमान ४.८ अब्ज डॉलरची प्रगत यंत्रणा खरेदी केली, असे व्यापारी नोंदींवरून दिसते. यातील काही चिप्स अवैधरित्या चीनकडे वळवल्या गेल्याचा अमेरिकी अधिकाºयांचा संशय आहे. सिंगापूरच्या यंत्रणांनीही २०२५ मध्ये अ‍ॅलिस हुआंगची चौकशी करून तिला सोडून दिले होते. हा तपास आधी वाणिज्य विभागाकडे होता, तो यंदा न्याय विभागाकडे गेला.

एनव्हिडियाच्या प्रमुखांशी संबंध कसा उघड झाला?

अमेरिकी गुप्तचर यंत्रणा अ‍ॅलिस हुआंगच्या संदेशवहनावर लक्ष ठेवून होत्या. त्यात एका अमेरिकी नागरिकाशी तिचा संपर्क आढळला. ‘अनमास्किंग’ नावाच्या प्रक्रियेद्वारे तो नागरिक जेन्सन हुआंग असल्याचे समोर आले. परदेशी व्यक्तीवरील अधिकृत पाळतीदरम्यान एखाद्या अमेरिकी नागरिकाचे संदेश अनवधानाने गोळा झाल्यास, नियमांनुसार त्याची ओळख अशा प्रकारे उघड करता येते. जून २०२४ मध्ये तैपेईतील एका बारमध्ये हे दोघे इतर अधिकाºयांसोबत असल्याची छायाचित्रे एका तंत्रज्ञान कंपनीने लिंक्डइनवर टाकली होती. मे २०२५ मध्येही एका व्यावसायिक भोजनानंतर ते तैपेईतील एका उपाहारगृहातून बाहेर पडताना दिसले होते.

अमेरिकेला चिंता का?

जेन्सन हुआंग हे अमेरिकेच्या एआय उद्योगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. चीनवरील तांत्रिक आघाडी टिकवण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांत त्यांची कंपनी महत्त्वाची आहे. शिवाय तंत्रज्ञान, उत्पादन, रोजगार आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर ट्रम्प प्रशासनाशी त्यांचा थेट संवाद असतो. या भेटींमधून अ‍ॅलिस हुआंगला एनव्हिडियाच्या व्यावसायिक योजनांची माहिती मिळाली असेल का, आणि चीनला ट्रम्प यांच्या चिप-निर्यातविषयक विचारांचा अंदाज आला असेल का, अशी चिंता अमेरिकी गुप्तचर अधिकाºयांना होती. जेन्सन हुआंग स्वत: चीनला चिप विक्रीवरील निर्बंध शिथिल करावेत यासाठी ट्रम्प प्रशासनाकडे आग्रह धरत असल्याने हा मुद्दा अधिकच संवेदनशील ठरला. वर्षभरापूर्वी ट्रम्प यांना याची माहिती देण्यात आली होती, पण त्यांनी कारवाई केली नाही. चिप विक्री आणि चीनशी व्यापारी संबंध यांत अडथळा नको, असे त्यांचे मत होते. त्या वेळी जेन्सन हुआंग यांना या कथित हेरगिरीची कल्पना असल्याचे अधिकाºयांना वाटत नव्हते. परदेशी गुप्तचर यंत्रणांचे लक्ष्य ठरू शकणाºया अमेरिकी नागरिकांना दिला जाणारा सावधगिरीचा इशाराही त्यांना देण्यात आलेला नाही. तसे केल्यास पाळत ठेवलेल्या व्यक्तीला सुगावा लागण्याची भीती असते.

एनव्हिडिया आणि मेगास्पीडचे म्हणणे..

एनव्हिडियाने हे आरोप फेटाळले आहेत. ह्यमिस हुआंग यांच्याशी जेन्सन यांचा संवाद असामान्य किंवा अनपेक्षित नाही. ग्राहकांच्या भेटी घेणे हा सीईओच्या कामाचा भाग आहे; जेन्सन दरवर्षी हजारो ग्राहक-अधिकाºयांशी बोलतात,ह्ण असे कंपनीचे प्रवक्ते जॉन रिझो यांनी म्हटले. मेगास्पीडसारख्या प्रादेशिक ग्राहकांना सर्वसाधारण व्यावसायिक माहितीच दिली जाते, कंपनीची गोपनीय व्यापारी रहस्ये किंवा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. चिप्स वळवल्याचे आरोप गेल्या वर्षीच सखोल तपासात खोडून काढले गेले होते, असेही कंपनीचे म्हणणे आहे. मेगास्पीडने सांगितले की कंपनीचे सध्याचे नेतृत्व हे आरोप गांभीयार्ने घेत असून बाहेरील कायदेशीर सल्लागार नेमून अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. अमेरिकी सरकारला सहकार्य करण्याची तयारीही कळवण्यात आली आहे. अ‍ॅलिस हुआंगवर अमेरिकी गुप्तचर यंत्रणांची पाळत अजूनही सुरू आहे. मेगास्पीडशी संबंधित कंपन्या यंदाही, अनेकदा मध्यस्थांमार्फत, एनव्हिडियाची उत्पादने खरेदी करत आहेत. सध्या हे सर्व आरोप असून तपास चालू आहे.

Read About : Amazon Layoffs 2026 – अ‍ॅमेझॉनने २५० कर्मचाऱ्यांना बसवले घरी https://epunyanagari.com/amazon-layoffs-2026/

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.