Ad Advertisement Ad Advertisement

Chhatrapati Sambhajinagar 171 Students Degree Convocation – महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या 171 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान

गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्ण व रौप्य पदकांनी गौरव

छत्रपती संभाजीनगर :Chhatrapati Sambhajinagar 171 Students Degree Convocation – महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचा पाचवा दीक्षान्त समारंभ रविवारी (दि.१) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभात विविध अभ्यासक्रमांतील एकूण १७१ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. विशेष म्हणजे, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण व रौप्य पदके, प्रायोजित सुवर्णपदके आणि पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मेहनतीला मिळालेली ही पावती ठरली.
या समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी, न्यायमूर्ती संतोष जी. चपळगावकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.

पदवी म्हणजे केवळ प्रमाणपत्र नव्हे, जबाबदारीही!

कुलगुरू डॉ. बिंदू एस. रोनाल्ड यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीचा, संशोधन उपक्रमांचा, पायाभूत सुविधांच्या विकासाचा तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहकार्याचा आढावा घेतला. अनुभवाधारित विधी शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांनी या यशामागे विद्यार्थ्यांचे परिश्रम, पालकांचे त्याग आणि विद्यापीठाने दाखविलेला विश्वास असल्याचे नमूद केले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या पदवीकडे केवळ शैक्षणिक पात्रता म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीनेही पाहावे, असा संदेश या मनोगतातून देण्यात आला.
विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांचा संदेश प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी यांनी वाचून दाखविला. या संदेशात पदवीधर विद्यार्थ्यांना उद्देशून, ‘तुम्ही केवळ पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी नसून ज्ञानाचे संवाहक, न्यायाचे ध्वजवाहक आणि परिवर्तनाचे शिल्पकार आहात,’ असे प्रेरणादायी प्रतिपादन करण्यात आले.

न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश

दीक्षांत भाषणात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांनी कायद्याचे बदलते स्वरूप आणि विधी क्षेत्रातील नव्या आव्हानांवर प्रकाश टाकला. कायद्याच्या विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्ती, चिकित्सक विचार आणि सामाजिक संवेदनशीलता विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पारंपरिक दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन समाजातील वास्तव समजून घ्यावे. ज्ञान, विवेक आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेच्या आधारे न्यायप्रस्थापनेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी पदवीधरांना केले. विद्यार्थ्यांसाठी हा संदेश विधी क्षेत्रातील भविष्यातील वाटचालीला दिशा देणारा ठरला. कुलसचिव डॉ. धनाजी जाधव यांनी आभार मानले.

प्रायोजित सुवर्णपदकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

दीक्षांत समारंभात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रायोजित सुवर्णपदके आणि पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यात आदिती पांडे, आदिती शुक्ला, चार्वी सहाय, शुभांगी ठाकूर, कृतिका गौतम, सिंग आर्या संजीव, कृतिका कुमारी यांचा समावेश होता.

Read About : Teachers Diwali Holidays Extended – शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्या 21 नोव्हेंबरपर्यंत वाढल्या
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.