निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये NPCI, PhonePe आणि Razorpayच्या प्रमुखांचे मंथन; यूपीआय व्यवहारांचे तंत्रज्ञान आणि भविष्यातील पेमेंट सुविधांवर चर्चा.
बंंगळुरू : UPI Digital Payments India धान्य, सोने, कागदी नोटा ते प्लास्टिक कार्डस… इतिहासात पैशाचे रूप सातत्याने बदलत गेले आणि भारतात ते शेवटी एका ‘आवाजात’ रूपांतरित झाले — ‘५० रुपये प्राप्त झाले!’ असा दुकानदार किंवा व्यापाऱ्याच्या साऊंडबॉक्समधून येणारा आवाज आधुनिक पैशाचे रूप. आज भारतात दररोज सुमारे १ अब्ज (१०० कोटी) युपीआय व्यवहार होतात. पण ही अवाढव्य यंत्रणा कोण चालवते, त्याचा खर्च कोण करतो आणि पुढे काय बदल होणार? या प्रश्नांचा वेध प्रसिद्ध उद्योजक निखिल कामत यांनी त्यांच्या ‘डब्ल्यूटीएफ इज पेमेंट’ या पॉडकास्टच्या ताज्या भागात घेतला आहे.
या चर्चेत भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रातील प्रमुख तीन स्तंभांचे प्रमुख सहभागी झाले होते. त्यात एनपीसीआच्या कार्यकारी संचालक सोहिनी रजोला, ‘रेझर पे’चे सह-संस्थापक व सीईओ हर्षिल माथूर, ‘फोन पे’चे संस्थापक व सीईओ समीर निगम यांचा समावेश होता. UPI Digital Payments India
‘यूपीआय’मागचे अदृश्य तंत्रज्ञान
अत्यंत सोप्या वाटणाऱ्या एका यूपीआय ट्रान्सफरमागे तब्बल १० एपीआय कॉल्स, रिअल-टाईम फ्रॉड चेक्स आणि एनपीसीआयद्वारे दिवसातून १० वेळा होणारे बँकांमधील सेटलमेंट काम करत असते. समीर निगम यांनी सांगितले की, सुरुवातीला ही यंत्रणा अवघ्या २० लोकांच्या टीमने अत्यंत शांतपणे विकसित केली होती. UPI Digital Payments India
३०% बाजार वाटा मर्यादेवर वाद-प्रतिवाद
फोनपे आणि गुगल पे या दोन ॲप्सचा यूपीआय व्यवहारांत सुमारे ८०% वाटा आहे. एनपीसीआयने त्यावर ३०% बाजार वाटा मर्यादा घालण्यावर पॉडकास्टमध्ये तीव्र चर्चा झाली. ग्राहकांनी पसंती दिली म्हणून ॲपची वाढ रोखणे योग्य आहे का, असा सवाल समीर निगम यांनी केला. तर दुसरीकडे, बाजारपेठेत निरोगी स्पर्धा आणि दीर्घकालीन स्थैर्यासाठी विविध पर्यायांची गरज असल्याचे मत हर्षिल माथूर व सोहिनी रजोला यांनी मांडले. UPI Digital Payments India
जीएसटी कपातीचा खपावर थेट परिणाम
फोनपेच्या डेटाचा संदर्भ देत समीर निगम यांनी सांगितले की, ज्या वस्तूंवर जीएसटी २% ने कमी झाला, तिथे खर्च ५.५ ते ६% ने वाढला. जिथे जीएसटी ५% ने कमी झाला, तिथे खर्च तब्बल १३% ने वाढला; तर दर स्थिर असलेल्या ठिकाणी विक्रीत फारसा बदल झाला नाही.
डिजिटल पैशांच्या एकूण देवाणघेवाणीत दुसऱ्या श्रेणीतील शहरे (टियर-२) आणि ग्रामीण भारताचा वाटा सातत्याने ६५ ते ७०% राहिला आहे. UPI Digital Payments India
क्यूआर कोडनंतर पुढे काय?
एनएफसी आणि ‘टॅप-टू-पे’ : ‘सेव्हन’चे संस्थापक विजय खूबचंदानी (ज्यांनी रूपे सोबत ‘सेव्हन रिंग’हे पेमेंट रिंग लाँच केले) यांच्या मते, क्यूआर कोड हा शेवटचा पर्याय नाही. लवकरच फोन आणि साऊंडबॉक्स टॅप-टू-पे स्वीकारू लागतील, ज्यामुळे देशात एनएफसी टचपॉइंट्स १ कोटींवरून ४ ते ५ कोटींवर जातील. UPI Digital Payments India
आंतरराष्ट्रीय पेमेंट : ‘पेग्लोबल’चे सह-संस्थापक प्राची धराणी, योगेश लोखंडे आणि ‘डोडो पेमेंट्स’चे आयुष अग्रवाल यांनी भारतीय ब्रँड्सना जागतिक स्तरावर पेमेंट स्वीकारताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील सोल्यूशन्सवर प्रकाश टाकला. पेमेंट हा पूर्णपणे विश्वासाचा व्यवसाय असून, नियमांचे पालन करणे ही नंतरची गोष्ट नसून व्यवसायाचा मुख्य पाया असायला हवा, असा मोलाचा सल्ला या दिग्गजांनी दिला.
नव्या स्टार्टअप्ससाठी सल्ला
पॉडकास्टचा शेवट नवीन उद्योजकांसाठीच्या महत्त्वाच्या सल्ल्याने झाला. नवीन पेमेंट ॲप बनवण्याऐवजी खालील क्षेत्रांत मोठे काम करता येऊ शकते असे सांगण्यात आले :
- लहान दुकानदारांसाठी जीएसटी, टीडीएस आणि बिल पडताळणी सुलभ करणारी साधने.
- यूपीआय प्रणालीत टिपिंग आणि सुरक्षित ईस्क्रॉपेमेंट्स.
- वैद्यकीय पर्यटनासाठी सोपे आंतरराष्ट्रीय पेमेंट.
Read About : Mercury to Gold Conversion – प्राचीन भारतीय रसायनविद्येच्या मदतीने पाऱ्याचे सोन्यात रूपांतर?, MNIT करणार पडताळणी
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.