मानवी आरोग्यावर नेमका किती परिणाम होतो, यासाठी अधिक संशोधनाची गरज
मुंबई : Microplastics in Tea Bags प्लास्टिकपासून बनवलेल्या चहाच्या पिशव्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहेत. एका नव्या वैद्यकीय अभ्यासानुसार, जेव्हा या प्लास्टिक चहाच्या पिशव्या गरम पाण्यात किंवा चहात बुडवल्या जातात, तेव्हा त्यातून तब्बल २,५०० मायक्रोप्लास्टिकचे कण आणि अत्यंत घातक बीपीए हे रसायन चहामध्ये विरघळत असल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
पारंपारिक विरूद्ध प्लास्टिक टी-बॅग्स
अनेक कंपन्या चहाची पिशवी पाण्यात फाटू नये आणि दिसायला आकर्षक वाटावी म्हणून कागदाऐवजी नायलॉन किंवा प्लास्टिक मिश्रित घटकांचा वापर करतात. गरम पाण्याचा संपर्क येताच हे प्लास्टिक वितळू लागते.
आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम
हार्मोनल असंतुलन : चहाच्या पिशव्यांमधून बाहेर पडणारे बीपीए हे रसायन शरीरातील हार्मोन्सच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करते. यामुळे वंध्यत्व आणि इतर संप्रेरक आजारांचा धोका वाढतो.
मायक्रोप्लास्टिकचा शरीरात संचय : हे अतिसूक्ष्म प्लास्टिकचे कण चहाद्वारे शरीरात गेल्यावर रक्तप्रवाह, यकृत आणि किडनीमध्ये जमा होतात, ज्यामुळे अंतर्गत अवयवांना सूज येऊ शकते.
पचनसंस्थेचे आजार : रोजच्या चहातून शरीरात जाणारे प्लास्टिक पचनसंस्थेचे गंभीर नुकसान करू शकते.
Read About : District Hospital Advanced X-Ray – जिल्हा रुग्णालयात 30 लाखांचे अत्याधुनिक एक्सरे मशीन
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.