Ad Advertisement Ad Advertisement

AI Global Trade Growth : टॅरिफ आणि युद्धाच्या तणावातही जागतिक व्यापाराला विक्रमी गती

अमेरिकेचे टॅरिफ आणि मध्यपूर्वेतील युद्धाच्या तणावानंतरही जागतिक व्यापारात वाढ; एआय चिप्स, सेमीकंडक्टर्स आणि डेटा सेंटर उपकरणांच्या मागणीचा मोठा वाटा

वॉशिंग्टन : AI Global Trade Growth अमेरिकेचे नवे कर (टॅरिफ) आणि मध्यपूर्वेतील युद्ध-तणाव यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय अडचणींनंतरही जागतिक व्यापारात अभूतपूर्व वेगाने वाढ होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची प्रचंड मागणी ही या वाढीचे सर्वात मोठे कारण ठरली आहे. ‘डीएचएल’ आणि न्यू यॉर्क विद्यापीठाच्या ‘स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस’ने जाहीर केलेल्या ‘डीएचएल ग्लोबलायझेशन ट्रॅकर’ अहवालातून ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार, २०२५ मध्ये जागतिक जागतिकीकरणाने २५.८ टक्क्याचा नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

‘एआय’च्या लाटेमुळे व्यापाराला गती

२०२६ च्या पहिल्या सहामाहीत जगभरातील वस्तूंच्या व्यापारात गेल्या १५ वर्षांतील (कोविडनंतरचा काळ वगळता) सर्वात जलद वाढ झाली आहे.

सेमीकंडक्टर्स आणि डेटा उपकरणे

AI Global Trade Growth एआय डेटा सेंटर आणि पायाभूत सुविधांसाठी लागणाऱ्या सेमीकंडक्टर चिप्स आणि नेटवर्किंग उपकरणांच्या मागणीने जागतिक व्यापाराला चालना मिळाली. AI Global Trade Growth

व्यापारात ४२ टक्के वाटा

२०२५ मधील एकूण जागतिक वस्तू व्यापाराच्या वाढीपैकी ४२% वाटा एआयशी संबंधित वस्तूंचा होता. २०२६ च्या पहिल्या तिमाहीत हा वाटा थेट ७६% वर पोहोचला.AI Global Trade Growth

सध्याच्या जागतिक व्यापाराला चालना देण्यात एआयची सर्वात मोठा वाटा आहे. टॅरिफ किंवा कर यांचा प्रभाव त्यामानाने कमी आहे. एआयला विचारला जाणारा प्रत्येक प्रश्न (सर्च किंवा क्वेरी) ही लॉजिस्टिक्सवर अवलंबून असते. एआयसाठी लागणाऱ्या चिप्स योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचवणे आवश्यक असते.
— जॉन पियरसन (सीईओ, डीएचएल एक्सप्रेस)

इराण युद्ध अन् टॅरिफचा प्रभाव मर्यादित

इराणमधील युद्ध आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे सागरी व्यापार मार्गांवर मोठा परिणाम झाला. सौदी अरेबियाचा व्यापार ३७% तर युएईचा ७% ने घटला. तसेच अमेरिकेने लादलेल्या नवीन टॅरिफमुळे अडचणी निर्माण झाल्या. तथापि, या धक्क्यांचा जागतिक व्यापारावर मर्यादित परिणाम झाला. कारण:

  • जागतिक आयातीमध्ये अमेरिकेचा वाटा केवळ १३% आहे आणि ऑगस्ट २०२६ पर्यंत अमेरिकेतील निम्म्या आयातीला या टॅरिफमधून सूट देण्यात आली होती.
  • बहुतांश देशांनी प्रतिशोधात्मक कारवाई न करता इतर देशांसोबत नवीन व्यापार करार करून आपले पर्याय खुले केले.
भारत, आशियाई देशांची मजबूत कामगिरी

जागतिक स्तरावर पूर्व आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रात व्यापारात २४% ची सर्वाधिक वाढ नोंदवली गेली. यापाठोपाठ युरोप (१२%) आणि उप-सहारा आफ्रिका (११%) यांचा क्रमांक लागतो.

दक्षिण व मध्य आशियाई क्षेत्राच्या व्यापारात ९.६% ची वाढ झाली असून, २०२६ ते २०२९ दरम्यान हा भाग जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगाने वाढणारा व्यापार मार्ग ठरेल असा अंदाज आहे. अमेरिका-चीन यांच्यातील थेट व्यापार ३.५% वरून १.६% वर खाली आला असला, तरी भारताचे अमेरिकेसोबतचे व्यापार संबंध अत्यंत मजबूत आहेत. भारताने युरोपियन युनियन (ईयू), ब्रिटन (यूके), न्यूझीलंड आणि ओमान यांसारख्या देशांशी व्यापार करार करून आपले पर्याय अधिक मजबूत केले आहेत.

२०२९ पर्यंतचा जागतिक अंदाज

२०२९ पर्यंत जागतिक वस्तू व्यापार दरवर्षी सरासरी ३.४% ने वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या दशकातील २.७% वाढीच्या तुलनेत हा वेग लक्षणीयरीत्या जास्त आहे. जागतिक कंपन्यांनी पुरवठा साखळीतील अडथळ्यांना यशस्वीपणे तोंड देत नवीन बाजारपेठा शोधल्यामुळे हा सकारात्मक बदल शक्य आहे.

Read About : Bio-Hybrid Robots – उंदराच्या पेशींपासून बनवले उड्या मारणारे बायो-हायब्रिड रोबोट्स; शास्त्रज्ञांचा अनोखा शोध

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.