Ad Advertisement Ad Advertisement

AI Training in Business Schools – एआयचे धडे; पण दैनंदिन वापराच्या प्रशिक्षणाची बोंब

GMAC च्या २०२६ ॲप्लिकेशन ट्रेंड्स सर्वेक्षणानुसार, ७१ टक्के व्यवस्थापन अभ्यासक्रमांमध्ये एआयचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण; मात्र केवळ ३७ टक्के संस्थांमध्ये दैनंदिन कामांसाठी प्रशिक्षण

वॉशिंग्टन : AI Training in Business Schools कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयमुळे कंपन्यांमधील कामकाज, कर्मचारी व्यवस्थापन आणि व्यावसायिक निर्णय घेण्याच्या पद्धती बदलत आहेत. त्यामुळे भविष्यातील व्यवस्थापकांना एआय वापरण्याचे कौशल्य असणे आवश्यक बनले आहे. मात्र, जगातील व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयांत (बिझनेस स्कूल) एआय शिकवले जात असले, तरी दैनंदिन कामासाठी त्याचा वापर करण्याचे प्रशिक्षण तुलनेने कमी दिले जात असल्याचे नव्या अहवालातून समोर आले आहे.

ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲडमिशन कौन्सिलच्या (जीएमएसी) २०२६ ॲप्लिकेशन ट्रेंड्स सर्व्हेनुसार, ७१ टक्के व्यवस्थापन शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये एआयचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाते. यात बिझनेस सिम्युलेशन आणि प्रत्यक्ष व्यावसायिक उपयोगांचा समावेश आहे. बिझनेस सिम्युलेशन म्हणजे एक संवादी अनुभवात्मक शिक्षण टूल, जे सहभागींना एक वास्तववादी आणि जोखीमुक्त वातावरणात आभासी पद्धतीने कंपनी चालवण्याची संधी देते. ६६ टक्के संस्थांमध्ये व्यावसायिक निर्णयप्रक्रिया आणि रणनीती आखण्यासाठी एआयचा वापर शिकवला जातो. तर ५८ टक्के अभ्यासक्रमांमध्ये एआयचे सामाजिक परिणाम आणि व्यावसायिक नैतिकतेवर चर्चा होते. AI Training in Business Schools

दैनंदिन कामात एआय वापर शिकवण्याकडे दुर्लक्ष

अहवालातील महत्त्वाची बाब म्हणजे, केवळ ३७ टक्के संस्थांमध्ये प्रॉम्प्ट रायटिंग आणि दैनंदिन कामांसाठी एआय टूल्स वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाते. फक्त २१ टक्के संस्था विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक शिक्षण पद्धतीसाठी एआय वापरतात. विशेष म्हणजे, केवळ ८ टक्के अभ्यासक्रमांमध्ये एआय समाविष्ट करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. AI Training in Business Schools

विद्यार्थ्यांच्या अपेक्षा काय?

४६ टक्के विद्यार्थ्यांना प्रॉम्प्ट रायटिंग आणि रोजच्या कामातील एआय वापर शिकायचा आहे; मात्र असे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था ३७ टक्केच आहेत. प्रत्यक्ष एआय अनुभवाला ६६ टक्के विद्यार्थ्यांनी महत्त्व दिले आहे.

३९ देशांतील संस्थांचा अभ्यास

या सर्वेक्षणात ३९ देशांमधील ३१४ व्यावसायिक महाविद्यालयांच्या १,१६२ व्यवस्थापन अभ्यासक्रमांचा समावेश होता. एआयचे ज्ञान मिळवण्याबरोबरच त्याच्या मर्यादा समजून जबाबदारीने वापर करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना देणे हे आता व्यवस्थापन शिक्षणासमोरील महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे. AI Training in Business Schools

Read About : OpenAI Mathematical Breakthrough – ‘ओपनएआय’चा गणित, भौतिकशास्त्रात पराक्रम!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.